vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते व पूल बांधणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते व पूल बांधणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

         राज्य प्रतिनिधी   मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते व पूल बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा-2 मध्ये 10 हजार किमी लांबीचे रस्त्यांच्या उद्दिष्ट आहे. यापैकी 7 हजार किमी लांबीचे रस्ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये बांधायचे ते ठरले आहे. 3 हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या टप्प्यात संशोधन व विकासासाठी आणखी 7 हजार किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या टप्प्यात महानगरपालिका, साखर कारखाने, औष्ण‍िक विद्युत केंद्र, वाळू आणि खडीच्या खाणी, मोठ्या नद्या, औद्योगिक परिसरापासून 10 किमीच्या आणि नगरपालिका, नगरपरिषदा, छावणी बोर्ड हद्दीपासून 5 किमीच्या मर्यादेतल्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी निवड करण्यात येईल. रस्त्यांची दर्जोन्नती केलेल्या मात्र पुलांअभावी दळणवळण होत नसलेल्या ठिकाणी पूल उभारण्यात येतील.

 

—–०—–

संबंधित पोस्ट

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात आजचे हवामान कसे असेल, IMD कडून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

सेवा पंधरवड्यात भटके, विमुक्तांना लाभाचे वाटप

रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावातले 19 बंगले रश्मी ठाकरेंच्या नावावर आहेत का? सरपंच उत्तर देत म्हणाले… कोर्लई गावाचे सरपंच

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून-परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध…

vishwatmaklokswamivarta

आशा वर्कर संघटनेकडून सतीश घाटगे यांचा सत्कार मानधन वाढीसाठी सरकार दरबारी प्रयत्न केल्याबद्दल मानले आभार

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला अखेर  रुग्णालयातून डिस्चार्ज…

vishwatmaklokswamivarta