vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते व पूल बांधणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते व पूल बांधणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

         राज्य प्रतिनिधी   मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते व पूल बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा-2 मध्ये 10 हजार किमी लांबीचे रस्त्यांच्या उद्दिष्ट आहे. यापैकी 7 हजार किमी लांबीचे रस्ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये बांधायचे ते ठरले आहे. 3 हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या टप्प्यात संशोधन व विकासासाठी आणखी 7 हजार किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या टप्प्यात महानगरपालिका, साखर कारखाने, औष्ण‍िक विद्युत केंद्र, वाळू आणि खडीच्या खाणी, मोठ्या नद्या, औद्योगिक परिसरापासून 10 किमीच्या आणि नगरपालिका, नगरपरिषदा, छावणी बोर्ड हद्दीपासून 5 किमीच्या मर्यादेतल्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी निवड करण्यात येईल. रस्त्यांची दर्जोन्नती केलेल्या मात्र पुलांअभावी दळणवळण होत नसलेल्या ठिकाणी पूल उभारण्यात येतील.

 

—–०—–

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय, सामाजिक विकासाच्या प्रवाहात युवा शक्तीचा सहभाग वाढविण्यासाठीजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन.

vishwatmaklokswamivarta

सोमठाणा खुर्द येथील प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळणार; कागदपत्रे सादर करण्याचे अकोट वन्यजीव विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• नाशिक ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करा• रिंग रोड प्रकल्पातील रस्तेकामांचा आराखडा 10 दिवसांत पाठवा..

रक्तसंकलनाचे नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठीराज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ धोरण- मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना-भरपगारी सुट्टी अथवा सवलत द्यावी- सहाय्यक कामगार आयुक्त एम. ए. मुजावर..

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहर जिल्ह्यात सेवा पंधरवड्याचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta