vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळप्रदेश

राष्ट्रीय, सामाजिक विकासाच्या प्रवाहात युवा शक्तीचा सहभाग वाढविण्यासाठीजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन.

राष्ट्रीय, सामाजिक विकासाच्या प्रवाहात युवा शक्तीचा सहभाग वाढविण्यासाठीजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन.

 

 

सांगली, प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली मार्फत 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत सामाजिक विकासाच्या प्रभावी माध्यमांची ओळख करून राष्ट्रीय व सामाजिक विकासाच्या प्रवाहात युवा शक्तीचा सहभाग वाढविण्याकरिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये सांगली जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व महाविद्यालय तसेच राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट व गाईड विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.

 

या उपक्रमांतर्गत 25 सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलवर व सर्व तालुका क्रीडा संकुलवर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. 26 सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथील प्रशिक्षण केंद्र, पोलीस भरती, आर्मी भरती सराव सराव करणाऱ्या खेळाडूंसाठी ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी प्रशिक्षण कार्यक्रम. 27 सप्टेंबर रोजी व्यायामशाळा, खुली व्यायामशाळा परिसर स्वच्छता उपक्रम, 28 सप्टेंबर रोजी विविध शाळांमधील जिमखाने स्वच्छता उपक्रम, 29 सप्टेंबर रोजी रस्ते वाहतूक नियमन मध्ये युवकांचा सहभाग, 30 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन तलाव परिसर स्वच्छता अभियान असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

 

000000

संबंधित पोस्ट

ग्रामपंचायतीमुळेच शासनाच्या योजना खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात पोहोचतात-महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे,रायगड जिल्हा परिषदेतर्फे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

13 व 14 जुलै रोजी पद भरतीसाठी परिक्षा;प्रतिबंधात्मक आदेश जारी

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध..

vishwatmaklokswamivarta

ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविणाऱ्या महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून अभिनंदन अतुलनीय कामगिरीने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या स्वप्नीलच्या कामगिरीचा भारतासह महाराष्ट्रवासियांना अभिमान

उष्णतेच्या लाटेच्या प्रतिसादासाठी मार्गदर्शक सूचनांची कोटेकोर अंमलबजावणी करा    – जिल्हाधिकारी संतोष पाटील

बांबू लागवडीला प्रोत्साहन देणार– मंत्री सुधीर मुनगंटीवार बांबूनिर्मित वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

vishwatmaklokswamivarta