vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशव्यवसाय

जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

 

 

 

राज्य प्रतिनिधी   रायगड,:- महाराष्ट्र शासन-कृषी विभाग यांच्यामार्फत कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, पत्रकार, संस्था अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रतिवर्षी कृषी पुरस्कार जाहीर करण्यात येतात. सन 2020, 2021, 2022 वर्षासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी दिली आहे.

 

कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, पत्रकार, संस्था अधिकारी आणि कर्मचारी यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट/ आदिवासी गट), पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार असे विविध पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

 

राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत- सन-2020- वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, डॉ.श्री.मकरंद अरविंद आठवले, मु.पो.नागांव ता.अलिबाग जि.रायगड. युवा शेतकरी पुरस्कार- कुमारी रसिका अनिल फाटक, मु.कोलाथरे पो.दहिगाव ता.सुधागड पाली, जि.रायगड. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार- श्री.धनंजय मधुकर जोशी, मु.नारळी जोशीबाग, पो.घोसाळे, ता.रोहा जि.रायगड.

 

 

 

सन -2021- वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, श्री. प्रकाश शांताराम ठाकूर, मु.पो.नागाव, ता.उरण जि.रायगड. कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार, श्री.संतोष काशिनाथ दिवकर, मु.पो.यशवंतखार, ता.रोहा जि.रायगड. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, श्री.सज्जन गोवर्धन पवार, मु.कानपोली, पो.पडघे, ता.पनवेल, जि.रायगड. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार श्री.धाया हिरा भला, मु.शेडाशी, पो.रानसई, ता.पेण, जि.रायगड.

 

सन-2022- जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, श्रीमती प्राची विजय शेपूंडे, मु.कुडली, पो.जामगाव, ता.रोहा, जि.रायगड. कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार, श्री.अनंत दत्तात्रेय भोईर, मु.टेमघर पो.चणेरा ता.रोहा जि.रायगड. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, प्रफुल्ल काळुराम खारपाटील, मु.पो.चिरनेर ता.उरण जि.रायगड

संबंधित पोस्ट

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील दोन गावांसाठी टँकर मंजूर

विधानसभा निवडणुकीत राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण आवश्यक –जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा

जगाचं लक्ष लागून असलेल्या मिस वर्ल्ड 2021, स्पर्धेवर देखील ओमिक्रॉनचं  सावट ,या स्पर्धेचा ग्रँड फिनाले  स्थगित 

vishwatmaklokswamivarta

खासदार एम आय एम चे ओवेसी महिनाखेरीस सोलापूर दौऱ्यावर! राष्ट्रवादी प्रमाणे,राजकीय भूकंपाची शक्‍यता

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव जिल्ह्यातील १ हजारहून अधिक युवतींचा सहभाग-कोल्हापूर येथील ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’त रणरागिणी बनण्याचा निर्धार ! 

vishwatmaklokswamivarta