vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील दोन गावांसाठी टँकर मंजूर

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील दोन गावांसाठी टँकर मंजूर

 

        बुलडाणा, प्रतिनिधी : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता चिखली तालुक्यातील दोन गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये भालगाव व कोलारा या ठिकाणी ठरवून दिल्याप्रमाणे टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती चिखली उपविभागीय अधिकारी यांनी दिली.

 भालगाव येथे 1 हजार 620 पशुधन व 3 हजार 273 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 96 हजार 600 लिटर्स पाणी पुरवठा करणार आहेत. कोलारा गावाला 4 हजार पशुधन व 4 हजार 856 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 1 लक्ष 76 हजार 660 लिटर्स पाणी दररोज टँकरव्दारे पुरवठा करेल.

पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या पाच गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

संबंधित पोस्ट

अनुकंपा नियुक्तीसाठी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसदारांचा परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा   – शिक्षणाधिकारी (योजना) महेश धोत्रे

येत्या शुक्रवारी ‘वैभव – विशाल’ गझल संध्या कार्यक्रम पत्रकार संघांतर्गत वृत्तेश्वर गणेश मंडळाचे आयोजन 

वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंडाचे-सार्वजनिक बांधकाम विभागास नि:शुल्क हस्तांतरण..

मुंबईतील बांद्रा पूर्व येथे  भारतनगर झोपडपट्टी भागात सिलेंडर स्फोट झाल्याने एका चाळीचा भाग कोसळल्याची घटना..

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ चित्ररथ सज्ज

vishwatmaklokswamivarta

डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पिक नोंदणी करण्याचे आवाहन