
खेळाडू विद्यार्थ्यांना वाढीव सवलतीच्या गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सांगली, प्रतिनिधी : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी), उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्याअन्वये संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी खेळाडूचे परिपूर्ण प्रस्ताव विहित नमुन्यात जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.
सन 2023-24 या वर्षातील सांगली जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा / महाविद्यालयाचे ग्रेस गुण चे परिपूर्ण प्रस्ताव दोन प्रतीत पुढील वेळापत्रकाप्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करावयाचे आहेत. दिनाक 12 मार्च 2024 रोजी तासगाव व खानापूर तालुका, 13 मार्च रोजी मिरज व कवठेमहाकाळ, 14 मार्च रोजी जत व आटपाडी, 15 मार्च रोजी कडेगाव व पलूस, 18 मार्च रोजी शिराळा व वाळवा, 19 मार्च रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रस्ताव सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावयाचे आहेत.
000000
सैनिक कल्याण विभागातील पदभरतीसाठी
ऑनलाईन अर्ज करण्यास 24 मार्च पर्यंत मुदतवाढ
सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट-क ची पदे भरण्याकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याकरीता दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजीचे सकाळी 11 वाजल्यापासून ते दिनांक 3 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा कालावधी देण्यात आला होता. लोकहितार्थ ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 4 मार्च 2024 ते 24 मार्च 2024 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. सर्व माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सांगली यांनी केले आहे.
00000



