vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

दक्षिण आफ्रिकेवर ‘हे’ 3 भारतीय धुरंधर पडतील भारी, करतात ताबडतोड फलंदाजी

दक्षिण आफ्रिकेवर ‘हे’ 3 भारतीय धुरंधर पडतील भारी, करतात ताबडतोड फलंदाजी.

खेळ प्रतिनिधीIND vs SA Series 2022: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जूनपासून 5 सामन्यांची टी-20 आंतराराष्ट्रीय मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत सर्वांचे लक्ष कर्णधार केएल राहुलकडे असेल. तर भारतीय ताफ्यात असे तीन फलंदाज आहेत, जे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ताबडतोड फलंदाजी करण्यात पटाईत आहेत. मालिकेतील पहिला सामना 9 जून रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात 9 जूनपासून 5 सामन्यांची टी-20 आंतराराष्ट्रीय मालिका सुरु होणार आहे. टेंबा बावूमाच्या नेतृत्वातील पाहूणा संघ भारत दौऱ्यावर (South Africa Tour of India) पोहोचला आहे, तर भारतीय संघाने देखील 5 जूनपासून मालिकेची तयारी सुरु केली आहे. तब्ब्ल दोन महिन्यानंतर दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय मैदानात परतणार आहेत. अशा स्थितीत या मालिकेसाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 जून रोजी दिल्लीच्या (Delhi) अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघ कटकमध्ये भिडतील. या मालिकेत सर्वांचे लक्ष कर्णधार केएल राहुलकडे असेल. तर भारतीय ताफ्यात असे तीन फलंदाज आहेत, जे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ताबडतोड फलंदाजी करण्यात पटाईत आहेत

मालिकेसाठी भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत त्याच्या जागी युवा फलंदाज ईशान किशनला सलामीला उतरवले जाऊ शकते. यंदाच्या हंगामात या फलंदाजाने आयपीएलमध्ये 418 धावा केल्या. त्यामुळे केएल राहुलला कर्णधार म्हणून पहिली मालिका जिंकण्यासाठी सलामीला किशनकडून खूप अपेक्षा असतील. अशा परिस्थितीत किशनला संधी मिळाल्यास तो दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करू शकतो.

दिनेश कार्तिक

आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर दिनेश कार्तिकचे आता तीन वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. कार्तिकने आयपीएलमधील आपला फॉर्म कायम ठेवला तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तो देखील तुफान फलंदाजी करू शकतो. आयपीएल 2022 मध्ये दिनेशने आरसीबीकडून खेळताना फिनिशरची भूमिका चोख बजावली आणि त्याच्या संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण सामने जिंकले.

3. हार्दिक पांड्या

भारतीय संघाचा धोकादायक अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचाही आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत समावेश करण्यात आला आहे. टी-20 विश्वचषक 2021 नंतर हार्दिक प्रथमच भारतीय संघात खेळताना दिसणार आहे. तसेच आयपीएल 2022 मोसमात हार्दिकने शानदार फलंदाजी करताना 487 धावा केल्या आणि गोलंदाजी करताना 8 विकेट्सही घेतल्या. अशा परिस्थितीत हार्दिकची प्रभावी अष्टपैलू कामगिरी दक्षिण आफ्रिकेला महागात पडू शकते.

 

संबंधित पोस्ट

पर्यायी बाजार व्यवस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अभ्यासासाठी गठीत दांगट समितीचा अहवाल शासनास सादर

vishwatmaklokswamivarta

महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

vishwatmaklokswamivarta

कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प सर्वेक्षण कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

राष्ट्र प्रथम, करोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन , कारगिल विजय दिवस आणि ओलंपिक वर संबोधन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. 

उमेदवारांना 9 नोव्हेंबरला मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन,भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी .

vishwatmaklokswamivarta

राज्यभर १ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’ केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आयोजन; ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ ही संकल्पना

vishwatmaklokswamivarta