vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर फिरत्या वाहनावर ध्वनीक्षेपकास निर्बंध

सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर फिरत्या वाहनावर ध्वनीक्षेपकास निर्बंध

 

 

 

ठाणे प्रतिनिधी: निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदूषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची व रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हादंडाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) मधील प्राप्त अधिकारानुसार निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही, सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही, दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनीक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल, सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरासंबंधित घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील, याप्रमाणे निर्बंध घातले आहेत. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि. 6 जून 2024 पर्यंत) अंमलात राहतील.

 

0000000000000

संबंधित पोस्ट

रमाई आवास योजना घरकुल पूर्णत्वाचे दाखले वितरणासाठी 20 डिसेंबरपासून कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

अमंली पदार्थांची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी-जिल्ह्यातील यंत्रणांनी सक्रिय सहभाग नोंदवावा- निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने

vishwatmaklokswamivarta

मुबईत दिवाळीच्या बोनस करिता उद्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप डेपोतून एकही बस न सोडण्याचा निर्णय..

vishwatmaklokswamivarta

बार्टी’मार्फत अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले ठाण्यातील लाडक्या बहिणींच्या घरी,आठवडाभरात एक कोटी घरांपर्यंत पोहोचवण्याचे शिवसेनेचे लक्ष्य,युवा सेनेवर या महत्वकांक्षी जनसंपर्क अभियानाची जबाबदारी

vishwatmaklokswamivarta

कराटे प्रशिक्षणामुळे मुलींना सुरक्षिततेचा नवा आत्मविश्वास- जिल्हाधिकारी अशोक काकडे- सांगलीच्या लेकी झाल्या ‘फायटर’! 38 हजार विद्यार्थिनी घेत आहेत स्वसंरक्षणाचे धडे

vishwatmaklokswamivarta