vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नाथषष्ठीनिमित्त सोमवारी (दि.९) पैठण येथेजिल्हा प्रशासनाचा ‘सेवाभक्ती संगम’

नाथषष्ठीनिमित्त सोमवारी (दि.९) पैठण येथेजिल्हा प्रशासनाचा ‘सेवाभक्ती संगम’

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- पैठण येथे “नाथ षष्ठी” निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे सोमवार दि.९ रोजी नाथांची भक्ती आणि प्रशासकीय सेवा असा संयोग साधून ‘सेवाभक्ती संगम’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पैठण येथिल तहसिलदार कचेरीत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

 पैठण येथे नाथषष्ठीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून भायेत असतात. नाथ महाराजांच्या दिंडीप्रित्यर्थ मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतांना प्रशासनामार्फत स्वच्छता अभियान, शासकीय योजनांची जनजागृती, आरोग्य तपासणी शिबिर इ. अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. प्रशासकीय यंत्रणेमार्फत विविध सेवा पुरविल्या जाणार आहेत. ‘सेवाभक्ती संगम’ हा कार्यक्रम हा सोमवार दि.९ रोजी सकाळी ९ वा. तहसीलदार कार्यालय पैठण येथील सभागृहात घेण्यात येणार आहे. भक्ती गीत, त्यानंतर शासकीय योजनांविषयी, शासकीय सेवांविषयी माहिती देण्यात येईल.छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान किंवा विविध महसूल अभियानाअंतर्गत द्यावयाचे समाधान शिबिर, शिबिराबद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. ग्राम विकास विभाग, कृषी विभाग इ. विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा याबद्दल माहिती देण्यात येईल.

 त्या नंतर श्री. संत एकनाथ महाराजांचे जीवन चरित्र व त्यांचे साहित्यावर सुप्रसिद्ध लेखिका/ कीर्तनकार डॉ. सविता मुळे(क्रांती डांगे) यांचे व्याख्यान होईल. त्या नंतर उपस्थित मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.

या निमित्ताने येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिर, महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री हे सुद्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

बीडच्या विकासासाठी वाढीव निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा नियोजनाचा ५७५ कोटींचा आराखडा सादर

 आताची मोठी बातमी – मुंबईकरांसाठी म्हाडा घरांच्या विक्रीसाठीची ऑनलाइन नोंदणी पुढे ढकलली!  

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील दोन साहित्यिकांचा प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मान डॉ. सुधीर रसाळ यांचा मराठीसाठी, डॉ. दिलीप झवेरी यांचा गुजराती साहित्यकृतीसाठी गौरव

आंतरराष्ट्रीय योग दिन; ‘माय भारत’ व ‘योगसंगम’ पोर्टलवर नोंदणी करा –जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

या दिवाळीत प्रियजनांना भेट द्या फास्टटॅगचा वार्षिक पास

vishwatmaklokswamivarta

नगर विकास विभागाच्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आज 

vishwatmaklokswamivarta