vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा-१ चा प्रारंभनागरिकांनी सेवांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा-१ चा प्रारंभनागरिकांनी सेवांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा -१ ला आज जिल्ह्यात १० ठिकाणी प्रारंभ झाला. १० मंडळस्तरावर आज मोठ्या उत्साहात समाधान शिबीरांचे आयोजन करण्यात आले. शेकटा मंडळातील देमणी या गावी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः उपस्थित होते. यावेळी त्यांनी नागरिकांनी शिबिरातील सेवांचा लाभ घ्यावा,असे आवाहन उपस्थितांना केले.

 देमणी येथील कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर आयुक्त खुलाशसिंग परदेशी, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसिलदार शिवानंद बिडवे तसेच जिल्हा परिषद सदस्य ज्योती शिंदे, पंचायत समिती सदस्य पुष्पाबाई साळुंखे, गयाबाई ठोंबरे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने शिबिराची सुरुवात झाली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विविध योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथाचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपस्थितांना समाधान शिबिरात मिळणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली. तसेच याशिबिरांच्या निमित्त आपले विविध दाखले, रेशनकार्ड, फेरफार नोंदी इ. विविध कामे गावातच करुन घ्यावीत,असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार शिवानंद बिडवे यांनी केले. सुत्रसंचालन ग्राम रोजगार सेवक सुभाष शेळके यांनी केले. शिबिरात विविध विभागाचे स्टॉल्स लावून नागरिकांना सेवा व योजनांची माहिती दिली जात होती. आरोग्य तपासणीसाठी सुद्धा स्टॉल लावण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा -१ जिल्ह्यात ८४ मंडळस्तरावर दि.७ ते १४ मार्च व एप्रिल महिन्यात १० ते १७ एप्रिल या कालावधीत तर नगरपालिकास्तरावर ८ ते १५ मे दरम्यान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दि.७ मार्च रोजी जिल्ह्यात भावसिंगपूरा अपर तहसिल, शेकटा ता. छत्रपती संभाजीनगर, निजलगाव ता. पैठण, वडोदबाजार ता. फुलंब्री, वेरुळ ता. खुलताबाद, चिंचोली ता. कन्नड, शिवना ता. सिल्लोड, जरंडी ता. सोयगाव, तुर्काबाद ता. गंगापूर, खंडाळा ता. वैजापूर. येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सर्व ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पुढील टप्प्यातील शिबिरांचे वेळापत्रकः-

दि.१० मार्च रोजी आपेगाव ता. पैठण, नाचनवेल ता. कन्नड, गोळेगाव बु. त. सिल्लोड, शेंदूरवादा ता. गंगापूर, शिऊर ता. वैजापूर.

दि.१४ मार्च रोजी ,चौका ता. छत्रपती संभाजीनगर, ढोरकीन ता. पैठण, पिरबावडा ता. फुलंब्री, चापानेर ता. कन्नड, अजिंठा ता. सिल्लोड, बनोटी ता.सोयगाव, वाळूज ता. गंगापूर, गारज ता. वैजापूर.

दि.२४ मार्च रोजी ,करमाड ता. छत्रपती संभाजीनगर, पिंपळवाडी ता. पैठण, चिकलठाण ता. कन्नड, पालोद ता. सिल्लोड, आसेगाव ता. गंगापूर, लासूरगाव ता. वैजापूर.

दि.३० मार्च रोजी,कचनेर ता. छत्रपती संभाजीनगर, नादर ता. पैठण, उंडणगाव ता. सिल्लोड, डोणगाव ता. गंगापूर, लोणी खु. वैजापूर.

दि.१० एप्रिल रोजी,कांचनवाडी, अपर तहसिल, वरुड काजी ता. छत्रपती संभाजीनगर, बिडकीन ता. पैठण, आळंद ता. फुलंब्री, बाजारसावंगी ता. खुलताबाद, पिशोर ता. कन्नड, निल्लोड ता. सिल्लोड, सावळदबारा ता. सोयगाव, हर्सूल ता. गंगापूर, जानेफळ ता. वैजापूर.

दि.१७ एप्रिल रोजी,पंढरपूर अपर तहसिल, चित्ते पिंपळगाव ता. छत्रपती संभाजीनगर, बालानगर ता. पैठण, बाबरा ता. फुलंब्री, सुलतानपूर ता.खुलताबाद, करंजखेडा ता. कन्नड, भराडी ता.सिल्लोड, सिद्धनाथ वडगाव ता. गंगापूर, महालगाव ता. वैजापूर.

दि.२३ एप्रिल रोजीलोहगाव ता. पैठण, देवगाव रंगारी ता. कन्नड, आमठाणा ता.सिल्लोड, गाजगाव ता.गंगापूर, बोरसर ता. वैजपुर.

दि.३० एप्रिल रोजीलाडसावंगी ता. छत्रपती संभाजीनगर, आडूळ ता. पैठण, हतनूर ता. कन्नड, अंभई ता. सिल्लोड, भेंडाळा ता. गंगापूर, नागमठाण ता.वैजापूर.

दि.५ मे रोजीपिसादेवी ता. छत्रपती संभाजीनगर, पाचोड ता. पैठण, नागद ता. कन्नड, बोरगाव बाजार ता. सिल्लोड, जामगाव ता. गंगापूर, बाबतारा ता. वैजापूर.

दि.८ मे रोजी,छत्रपती संभाजीनगर, पैठण, फुलंब्री, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, वैजापूर.

दि.१५ मे रोजी उस्मानपुरा अपर तहसिल, चिकलठाणा ता. छत्रपती संभाजीनगर, विहामांडवा ता. पैठण, मांजरी ता. गंगापूर, घायगाव ता. वैजापूर.

०००००

संबंधित पोस्ट

महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘सुलभ ‘चा महत्त्वपूर्ण पुढाकार भारतातील मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनावर व्यापक अहवाल प्रकाशित 

vishwatmaklokswamivarta

पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रिपेड टॅक्सी आणि ऑटो रिक्षाचे नवे भाडेदर जाहीर…

vishwatmaklokswamivarta

मनपा नियोजन विभागातून समाज संघटक दिनेश गमरे  सेवानिवृत्त

आंतरराष्ट्रीय योग दिनी 21 जूनला सकाळी 6.30 वा. वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी आनंदाची संधी!राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजना २०२५-२६-३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन