vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मास्टर प्लॅन राबविण्यावर भर – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मास्टर प्लॅन राबविण्यावर भर – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

 

​अहिल्यानगर, प्रतिनिधी अहिल्यानगर शहराची राज्यातील क्रमांक एक शहर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता असून व्यावसायिक, औद्योगिक व नागरीकरणाच्या दृष्टीने शहराचा सर्वंकष विकास साधण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करून तो पूर्णत्वास नेण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेशहरातील गुलमोहर रोड परिसरात लहान मुलांच्या व नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन उभारण्यात आलेल्या नवीन स्ट्रीट लाईट प्रकल्पाचे उद्घाटन विद्यार्थी आर्या घोडके, पार्थ खंडेलवाल, रिधान शिंदे व पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गोडे, उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेविका गौरी बोरकर, नगरसेवक ऋग्वेद गंधे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह स्थानिक नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, “शहराला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले असून त्या नावाला साजेसा विकास घडवून आणणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी विविध विकासकामांना गती देण्यात येईल.

शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यापूर्वीच सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून शहरातील प्रत्येक भागावर या यंत्रणेद्वारे प्रभावीपणे लक्ष ठेवले जात आहे. या यंत्रणेचे नियंत्रण पोलीस अधीक्षक कार्यालयातून करण्यात येत असून सुरक्षेच्या दृष्टीने ही व्यवस्था अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. भविष्यात या यंत्रणेचा अधिक विस्तार करून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही,” अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

शहरातील नागरिकांना अधिक चांगल्या व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहर व्यवस्थापन अधिक सक्षम व परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला जाईल. नागरिकांना सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून पुढील काळात अधिक प्रभावीपणे काम करण्यात येईल,” असेही पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

आमदार संग्राम जगताप म्हणाले , “गुलमोहर रोड परिसरातील लहान मुलांनी स्ट्रीट लाईटची लेखी स्वरूपात मागणी केली होती. पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी या मागणीची दखल घेऊन जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे काम पूर्ण करण्यात आले. परिसराच्या विकासासाठी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यास आपली प्राथमिकता आहे.” प्रत्येकाने स्वच्छतेची सवय अंगी बाळगत आपले शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात बुलढाण्याची उल्लेखनीय झेप; राज्यात अव्वल पाचमध्ये

शिक्षकांवर अन्‍याय करणारे शासन निर्णय रद्द करा ,मार्च महिन्‍याचे वेतन तात्‍काळ करा-सोमवारी विमाशि संघाचे धरणे / निदर्शने आंदोलन

राज्यातील अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईचे आदेश- मंत्री उदय सामंत

मतदान यंत्र तपासणी कार्यक्रम  सुरू२१ ते २३ जुलै दरम्यान चालणार प्रक्रिया

शेतरस्त्यांची उपलब्धता ही ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा

प्रतिस्पर्ध्यांना आसमान दाखवत पै.शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगिर ठरले जलसम्राट केसरीचे मान—-जवळपास एक हजार मल्लांचा सहभाग @ बक्षिसापोटी लाखो रुपयांची लयलूट @ कुस्तीप्रेमिंच्या डोळ्याचे फिटले पारणे

vishwatmaklokswamivarta