vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पाणीटंचाई निवारण्यासाठी विंधन विहिरींना मंजुरी

पाणीटंचाई निवारण्यासाठी विंधन विहिरींना मंजुरी

 

बुलडाणा, प्रतिनिधी : पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यात 41 गावांसाठी 7 कुपनलिका आणि 65 विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.

 

पाणी टंचाई निवारणार्थ शेगाव तालुक्यातील 4, सिंदखेडराजा 26, खामगाव 1, नांदुरा मधील 10, बुलडाणा 41 गावासाठी 7 कुपनलिका व 65 विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. य गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विंधनविहिरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, यांनी करावयाचा आहे. विंधन विहिरी शेगाव तालुक्यातील जानोरी, बेलुरा, कुरखेड, चिंचखेड. सिंदखेराजा तालुक्यातील दत्तपूर, डावरगाव, जऊळका, किनगाव राजा, पांगरी उगले, उगला, सावरगाव माळ, आडगाव राजा, शेलू, धांदरवाडी, जांभोरा, केशव शिवणी, वाघरुळ, वाकद जहागीर, मलकापूर पांग्रा, जळगाव, निमगाव वायाळ, पिंपळखुटा, निमखेड कसबा, सोनोशी, सोयदेव, तढेगाव, उमरद, वडाळी, वाघाळा, रुम्हणा, खामगाव तालुक्यातील खामगाव ग्रामीण, नांदुरा तालुक्यातील निमगाव, दादगाव, हिंगणा भोटा, हिंगणा दादगाव, बेलाड, खरकुंडी, पलसोडा, धाडी, हिंगणे गव्हाड, मोमिनाबाद या गावासाठी कूपनलिका व विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे. यामुळे या गावामधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चित मदत मिळणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

 

000000000

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी न केलेल्यांसाठी गावपातळीवर विशेष मोहिम

महाराष्ट्र राज्य लॉटरी नोव्हेंबर २०२४ चाभव्य सोडतीचा निकाल जाहीर..

vishwatmaklokswamivarta

जुने कालबाह्य,अभिलेखे निर्लेखित रद्दी विक्रीकरिता-इच्छूक पात्र खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात

vishwatmaklokswamivarta

मुंबई लोकल ट्रेन करिता, आतापर्यंत खूप सहन केले राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने पोलीस अधिक्षक कार्यालयात कार्यशाळा संपन्न…

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभासाठी प्रवेश अर्ज 26 ऑक्टोबरपर्यंत करण्याची मुदत..