जुने कालबाह्य,अभिलेखे निर्लेखित रद्दी विक्रीकरिता-इच्छूक पात्र खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात…
रायगड, प्रतिनिधी- पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयातील जुने कालबाह्य झालेले अभिलेखे निर्लेखित करण्याच्या दृष्टीने रद्दी म्हणून विक्रीस काढण्यात येत आहे. यासाठी संबंधित पात्र रद्दी खरेदीदार, वेस्ट पेपर्स सप्लायर खरेदीदारांनी दि.18 ते दि.30 डिसेंबर 2024 (शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस वगळता) या कालावधीमध्ये निविदा सादर कराव्यात असे, आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल रमेश चव्हाण यांनी केले आहे.
निविदेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे :- शॉप अॅक्ट लायसन्स (अधिकृत व नोंदणीकृत खरेदीदार असल्याचे प्रमाणपत्र), टॅन नंबर व जीएसटी भरल्याबाबत रिटर्न/पॅन कार्ड, निविदाधारक हा सरकारमान्य प्रमाणपत्र धारक, अधिकृत रद्दीचा विक्रेता पाहिजे, पेपर मिलचे प्रमाणपत्र (व्यवसाय प्रमाणपत्र), अनामत रक्कम रुपये 10,000/- चा राष्ट्रीय बँकेचा डीडी (प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल यांचे नावे), दरपत्रक सादर करताना ते प्रति किलो मध्ये सादर करावेत, बंधपत्र रुपये 100/- (ज्याचे टेंडर मंजूर करण्यात येईल त्याचे आवश्यक नियमाबाबतचे बंधपत्र लागेल.), पेपरमील मालक/व्यवस्थापक हे रद्दी विकत घेत असतील तर पेपरमील त्यांच्या मालकीची आहे. याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच पेपरमील मालक/व्यवस्थापक यांना आपण रद्दी पुरवठा करताना याबाबतचा संबंधीत पेपरमीलचा दाखला आणणे आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या निविदा मान्य करण्याचे वा रद्द करण्याचे सर्व अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल यांनी राखून ठेवले आहेत. मागविण्यात आलेल्या निविदा या आधीच्या अटी व शर्तीची पूर्तता करीत नसल्यामुळे रद्द समजण्यात याव्यात. दि. 30 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यत कार्यालयास प्राप्त झालेल्या निविदांचा विचार करण्यात येईल. त्यानंतर उशिराने प्राप्त होणाऱ्या निविदांचा कोणताही विचार केला जाणर नाही. या निविदा दि.31 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता पनेवल प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, पनवेल केंद्रीय सुविधा भवन, दुसरा मजला, लोखंड व पोलाद बाजार, कळंबोली, ता.पनवेल यांच्या कक्षात उपस्थित निविदाधारकांच्या समक्ष उघडण्यात येतील.000000