
लोकसभा निवडणूक कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू
बुलडाणा, प्रतिनिधी :
लोकसभा निवडणूक 2024ची घोषणा झाली असून दि. 16 मार्च पासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी यांना प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यात मुंबई पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) लागू करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी, तसेच मतदारसंघाचे मतदार नसतील अशा व्यक्तींनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय सभा घेऊ नये. जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक असल्याने दि. 26 एप्रिल 2024 रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टीने तसेच लोकसभा निवडणूक निर्भय व नि:पक्षपातीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मतदारसंघाचे मतदार नसतील, अशा व्यक्तींनी मतदानाचा दिनांक आणि मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर म्हणजे दि. 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेनंतर कोणत्याही प्रकारच्या राजकीय सभा घेऊ नये. तसेच मतदानाचा निश्चित केलेल्या दिनाकाच्या 48 तासाच्या अगोदर सदर मतदारसंघ सोडून जाण्याचे आदेश करण्यात आले आहे.
सदर बंदी आदेश संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याकरीता मलकापूर विधानसभा मतदारसंघ वगळून दि. 24 एप्रिल 2024 रोजीचे सकाळी 6 वाजेपासून ते दि. 26 एप्रिल 2024 च्या रात्री 22.00 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती मुंबई पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 135 व भारतीय दंड संहिता, 1860चे कलम 188 नुसार कार्यवाहीस पात्र राहणार आहे.
000000



