vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

हातमाग व वस्त्रोद्योग पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

हातमाग व वस्त्रोद्योग पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी :- भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील २०२४-२५ या शैक्षणिक सत्रासाठी तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) करीता १३ जागा व आर्थिक दृष्या दुर्बल घटकाकरीता १ जागा तसेच वेंकटगिरी करीता २ जागेच्या प्रवेशासाठी तसेच द्वितीय वर्षाकरीता ३ जागा (१ जागा आर्थिक दृष्या दुर्बल घटकाकरीता) पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर/सोलापूर/मुंबई व औरंगाबाद मार्फत विहीत नमून्यात प्रवेश अर्ज १० जून २०२४ पर्यंत मागविण्यात येत आहेत.

 

 

 

इच्छूक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज १० जून २०२४ पर्यंत संबंधीत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमूना व इतर अनूषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमूना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त अविष्यांत पंडा यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

झोन स्तरीय निरंकारी बाल समागम

संतोष भुतेकर यांना युवा पत्रकार पुरस्कार प्रदान…

 रस्ता सुरक्षा अभियानात वॉकेथॉन

vishwatmaklokswamivarta

करियर निवडीसाठी मानसशास्त्रीय मार्गदर्शन कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्यातील हत्याकांड – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड पुणे पोलिसांच्या ताब्यात सीआयडीला शरण, बीड पोलिसांच्या ताब्यात.

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा