vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे विधानसभा मतदारसंघात नियुक्त विविध पथकांनी दक्ष रहावे- सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील

ठाणे विधानसभा मतदारसंघात नियुक्त विविध पथकांनी दक्ष रहावे- सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत असलेल्या 148 ठाणे विधानसभा मतदारसंघांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या विविध पथकांच्या कामकाजाचा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांनी आढावा घेऊन सर्व पथकांना दक्षतेच्या सूचना केल्या.

 

यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डॉ. आसावरी संसारे उपस्थित होत्या. यावेळी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या आचारसंहिता विषयक नऊ भरारी पथके,नऊ स्थिर सर्वेक्षण पथके, चार व्हिडिओ सर्वेक्षण पथके, दोन व्हिडिओ पाहणी पथकांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाचा सखोल आढावा यावेळी घेण्यात आला. या मतदारसंघात माजिवडा नाका, बाळकुम नाका व साकेत नाका या तीन ठिकाणी कार्यान्वित होणाऱ्या स्थिर सर्वेक्षण पथकांनही दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या. आचारसंहिता विषयक पथके, एक खिडकी पथक व लेखा विषयक यांनी समन्वय साधून कशा प्रकारे काम केले पाहिजे, स्थिर सर्वेक्षण पथकाने कशा प्रकारे काम करावे याचेही सूक्ष्म मार्गदर्शन करण्यात आल. तसेच मतदारसंघातर्गत सहा पोलिस ठाणे यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना यांनादेखील कायदा व सुव्यवस्था बाबत जागरूक राहण्याच्या सूचना दिल्या.

 

आचारसंहितेचे योग्य रीतीने पालन व्हावे, राजकीय पक्षांचे प्रतिनिधींना विहित मुदतीत एक खिडकी द्वारे तत्काळ परवाने मिळावेत यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश श्रीमती पाटील यांनी यावेळी दिल्या. स्ट्रॉंग रुम सुरक्षे बाबत योग्य ती दक्षता घेण्याविषयीही त्यांनी संबंधितांना निर्देश दिले.

 

त्याचप्रमाणे उपस्थित राजकीय पक्षाचे प्रतिनिधींना देखील निवडणूक विषयक सुरू असलेल्या कामकाजाची माहिती देण्यात आली. विविध परवानग्या तत्काळ मिळण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती सविस्तर सांगण्यात आली . त्याच प्रमाणे 26 एप्रिल 2024 रोजी उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना पालन करावयाच्या नियमाविषयी देखील विस्तृत चर्चा करण्यात आली.

 

0000000000000

संबंधित पोस्ट

उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांचा सन्मान*

मुंबईतील पार्किंगची समस्या सुटणार, आता ऑनलाईन बुकिंग करता येणार

vishwatmaklokswamivarta

सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहंस्तातरण करुन घ्यावे -मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे

vishwatmaklokswamivarta

महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम,राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 (एफ) वर जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी अधिसूचना जारी..

जालना शहरातील अनेक युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

मुंबईत रविवारी मेगा ब्लॉकसह शॅडो ब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी घ्या संपूर्ण माहिती