vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल जाहीर ,सारथी’चे २० विद्यार्थी ‘युपीएससी’च्या अंतिम गुणवत्ता यादीत झळकले

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल जाहीर ,सारथी’चे २० विद्यार्थी ‘युपीएससी’च्या अंतिम गुणवत्ता यादीत झळकले

 

राज्य प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात सारथी, पुणे मार्फत मुलाखतीसाठी प्रायोजित ४५ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. ज्यात ४ विद्यार्थिनींचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातून ०६, नाशिक जिल्ह्यातून ०५, अहमदनगर जिल्ह्यातून २ तसेच कोल्हापूर बुलढाणा, जळगाव, अकोला, वाशिम, हिंगोली व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी यशस्वी झाला आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे संस्थेने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देऊन नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत निःशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. युपीएससी परीक्षा मुलाखतीच्या तयारीकरिता ४५ विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण नियोजित करून तज्ज्ञामार्फत झूम मिटिंगचे नियोजन करून विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात आले.

विनय सुनील पाटील, नाशिक- एआयआर रँक १२२ ,आशिष अशोक पाटील, कोल्हापूर एआयआर रँक 147, ठाकरे ऋषिकेश विजय, अकोला- एआयआर रँक २२४ , शामल कल्याणराव भगत, पुणे- एआयआर रँक २५८, उन्हाळे आशिष विद्याधर, बुलडाणा- एआयआर रँक २६७, निरंजन महेंद्रसिंह जाधवराव, पुणे- एआयआर रँक २८७, घोगरे हर्षल भगवान, पुणे- एआयआर रँक ३०८, शुभम भगवान थिटे, पुणे- एआयआर रँक ३५९, अंकित केशवराव जाधव, हिंगोली- एआयआर रँक ३९५, खिलारी मंगेश पराजी, अहमदनगर- एआयआर रँक 414, पाटील लोकेश मनोहर, जळगाव- एआयआर रँक ४९६, मानसी नानाभाऊ साकोरे, पुणे- एआयआर रँक ५३१,

आविष्कार विजय डेले, नाशिक- एआयआर रँक ६०४, केतन अशोक इंगोले, वाशिम- एआयआर रँक ६१०, देशमुख राजश्री शांताराम, अहमदनगर- एआयआर रँक 610, निकम सूरज प्रभाकर, नाशिक -एआयआर रँक ७०६, कुणाल संजय अहिरराव, नाशिक- एआयआर रँक ७३२, गौरी शंकर देवरे, पुणे – एआयआर रँक ७५९ , शुभम उत्तमराव बारकाळे, नाशिक -एआयआर रँक ८३७, श्रवण अमरसिंह देशमुख, सातारा- एआयआर रँक ९७६ असे आहे.

 

मागील तीन वर्षात सारथी संस्थेमार्फत ५८ विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी झाले आहेत. यावर्षी २० विद्यार्थी यशस्वी झाले असून आतापर्यंत सारथी संस्थेमार्फत एकूण ७८ विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी झाले आहेत

 

संबंधित पोस्ट

काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर-मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष…

महाराष्ट्र सरकारने आषाढी एकादशी वारीची पायी चालून पूर्ण करण्याची मागणी करणाऱ्या बंडातात्या कऱ्हाडकरांना वर्षातून एकदा स्थानबध्द करावेच

समाजप्रबोधन आणि राष्ट्र उभारणीत संतांचे योगदान मोठे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

अतिरेक्यांचे सारखं शिंदे गटातील आमदार आणण्यात आलं आहे कसाब सारखा एवढा बंदोबस्त कशासाठी ? शिवसेनेचा अधिकृत वीप … असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे

जीएसटी’ परिषदेत मंत्री आदिती तटकरे करणार राज्याचे प्रतिनिधीत्व-‘जीएसटी’ बाबत अधिकाऱ्यांकडून घेतला सविस्तर आढावा…

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर!*_*मणिपुरी थांग-ता, शिवकालीन युद्धतंत्र व अफजलखान वधाचे थरारक सजीव प्रात्यक्षिक!*

vishwatmaklokswamivarta