vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पीक कर्ज वितरण, बियाणे खते उपलब्धतेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

पीक कर्ज वितरण, बियाणे खते उपलब्धतेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-

खरीप हंगामाच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध व्हावे तसेच त्यांना बियाणे व खते योग्य वेळी उपलब्ध असावे यासाठी कर्ज वितरण व बियाणे उपलब्धतेबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा घेतला.

 

जिल्हा नियोजन सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुकेश बारहाते तसेच बियाणे वितरक, उत्पादक संस्था, रेल्वे, सर्व बॅंकांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

 

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ३९ हजार २६४ क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून पिकनिहाय त्याची मागणी व उपलब्धता नोंदविण्यात आली आहे. खरीप हंगामात सर्व प्रकारचे बियाणे उपलब्ध असल्याचे सांगितले. हे बियाणे आता वितरक ते विक्रेते यास्तरावर वितरण सुरु असून लवकरच बियाणे शेतकऱ्यांना नजिकच्या बियाणे विक्रेत्याकडे उपलब्ध होईल. तसेच खतांची मागणी ३ लाख २० हजार २६३ मे.टन इतकी मागणी असून २ लाख ८८ हजार ७०० मे.टन इतके आवंटन उपलब्ध आहे. तर १ लाख ५० हजार मे.टन इतका शिल्लक साठा आहे. त्यामुळे खताची उपलब्धता असल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीक कर्ज उपलब्धतेसाठी कर्ज नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. पीक कर्ज देतांना बॅंकांनी संवेदनशीलतेने प्रकरणे हाताळावीत अशी सुचनाही त्यांनी केली. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, शेतकऱ्यांना पीक कर्ज, बियाणे व खते हे वेळेवर उपलब्ध करुन द्यावे, जेणे करुन खरीप हंगामाचे नियोजन व्यवस्थित करता येईल.

संबंधित पोस्ट

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 मतदान केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात उद्योगांना चालना देण्यासाठी ‘मैत्री’ कायदा !एकल खिडकी योजनेमुळे उद्योजकांना परवानग्या मिळणार जलदगतीने

आत्माच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला बळकटी,सेंद्रिय शेतीसाठी परतूर तालुक्यात गट नोंदणीचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचाजन्मदिवस वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा 

vishwatmaklokswamivarta

शिवजयंतीनिमित्त ‘जय शिवाजी-जय भारत यात्रा’ उत्साहात;मान्यवरांचा सहभाग..

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2023-24 प्राथमिक छाननी गुणांकन प्रसिध्द करण्यासाठी सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta