vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अतिसार नियंत्रण पंधरवाड्याची पाडळीत सुरवात

अतिसार नियंत्रण पंधरवाड्याची पाडळीत सुरवात..

 

बुलडाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यात अतिसार नियंत्रण कार्यक्रम दि. ६ ते २१ जून राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळी येथे आज करण्यात आला.

 

यावेळी माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मिलींद जाधव यांनी ५ वर्षापर्यंतच्या बालकांना अतिसार, जुलाब आजारापासून सुरक्षित करण्यायासाठी ओआरएस पावडर आणि अतिसाराने आजारी असलेल्या बालकांना झिंक गोळ्यांचे वाटप आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी वाटप करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ओआरएस पावडर तसेच झिंक गोळ्यांच्या साठ्याची उपलब्धता, आवश्यक मनुष्यबळ आणि कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रसिद्धी विस्तार व माध्यम अधिकारी यांनी आरोग्य संस्थेमार्फत आरोग्य शिक्षण प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन कले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सरपाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखील जबरे, डॉ. नितीन कदम, अर्चना ईंगळे, आर. के. जाधव, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेश धुताडमल आदी उपस्थ‍ित होते.

 

00000

संबंधित पोस्ट

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024/  17-परभणी मतदारसंघासाठी आज मतदान मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मनाई आदेश लागू

मिरज शहरात कायमस्वरूपी सुधारित वाहतूक नियमन- फुलारी कॉर्नर ते दत्त चौक, दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक एकेरी मार्ग

vishwatmaklokswamivarta

ठळक बातमी ,उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाचे छापे; तब्बल 240 कोटींची मालमत्ता जप्त

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्यातील बाजार समितीवर धनंजय मुंडेचा झेंडा, पंकजा मुंडेंना धक्का

आंबा- मिलेट महोत्सव २०२५ चे उद्घाटन शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा द्या- राज्यपाल हरिभाऊ बागडे

vishwatmaklokswamivarta

12 आंतरराष्ट्रीय युवा दिन व पंधरवडा निमित्त आयोजित रेड रन स्पर्धेमध्ये मुलांमध्ये यश दत्ताराम म्हात्रे तर मुलींमध्ये पौर्णिमा हेमंत म्हात्रे प्रथम