vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

बाल धोरण प्रारुप मसुद्यासाठी हरकती व सुचना सादर कराव्यात..

बाल धोरण प्रारुप मसुद्यासाठी हरकती व सुचना सादर कराव्यात..

 

 

 

             जालना, प्रतिनिधी :- महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आलेली होती. प्रस्तावित महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा-2022 च्या संदर्भाने नागरिकांच्या हरकती व सूचना दि. 30 जुन 2024 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे-01 या पत्त्यावर अथवा childpolicy@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात याव्यात, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

 

महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा- 2022 मसुदा तयार केलेला आहे. सदर प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा -2022 हा इंग्रजी व मराठी भाषेमध्ये शासनाचे https://womenchild.maharashtra.gov.in व https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. तरी सदर प्रस्तावित बाल धोरण हे मुळामध्ये इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आलेला असून त्याचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे. या बाल धोरण व कृती आराखड्यामध्ये आवश्यक बावी, सुचना, सुधारणा तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या मसुद्यामध्ये शब्दरचना, व्याकरण या संदर्भाने हरकती व सुचना नागरिकांकडून मागविण्यात आल्या आहेत. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2024:सात मतदारसंघात 199 जणांचे 280 नामनिर्देशन अर्ज दाखल

vishwatmaklokswamivarta

विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरु- कृषिमंत्री धनजंय मुंडे…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‍मिरज शासकीय रूग्णालयातनवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस..

भारतीय रेल्वे श्री गणेश उत्सवानिमित्त गणपती विशेष रेल्वेगाड्यांच्या 380 विक्रमी फेऱ्या चालवणार

जिल्ह्यातील ताडी दुकानांच्या ई-लिलावात इच्छूकांनी सहभाग घ्यावा…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र एजन्सीची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची विकासकुमार बागडी यांची मागणी