vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‍मिरज शासकीय रूग्णालयातनवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस..

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‍मिरज शासकीय रूग्णालयातनवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस..

 सांगली, प्रतिनिधी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथील प्रसूतिपश्चात कक्षातून दिनांक 3 मे 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कोळे येथील कविता समाधान अलदार या महिलेचे 3 दिवसांचे पुरुष जातीचे बाळ अज्ञात महिलेने घेऊन गेल्याची घटना घडली होती. दिनांक 5 मे रोजी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करुन तिच्याकडून चोरी गेलेले बाळ ताब्यात घेऊन त्याच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले होते. या घटनेची राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन बाळाची त्याच्या मातेकडून आस्थेने विचारपूस केली व झालेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली

 यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता श्रीकांत अहंकारी, वैद्यकीय अधीक्षक प्रियांका राठी, मा. पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते.

 पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. जिल्ह्यात क्राईम राईट कमी होण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे बाळ चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर अगदी कमी कालावधीत पोलीस पथकाने बाळ शोधून काढले. हे बाळ सुरक्षित आहे. रूग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावीपणे बसविण्यासाठी तसेच रूग्णालयाची सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

 या प्रकरणात पोलीस विभागाने तात्काळ कारवाई करून आरोपी महिलेस अटक करून बाळ ताब्यात घेतल्याबाबत तपास पथकाचे अभिनंदन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकी प्रसंगी या पथकातील सर्वांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

000000

संबंधित पोस्ट

कर्तृत्वाचा महामेरू : नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांचा ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रकल्पग्रस्तांचा सकारात्मक प्रतिसाद स्थलांतरणाला पूर्ण सहकार्य करण्याचे सरपंचांचे आश्वासन

vishwatmaklokswamivarta

तरुण वयात गोर-गरीब व समाजाच्या सुख-दु:खात उपयोगात येणाराच खरा नायक :जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा महाराष्ट्र अधिक आनंदी, समृद्ध, प्रगतिशील होवो; उपमुख्यमंत्र्यांचे विघ्नहर्ता गणरायाचरणी साकडे

केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तयारीचा घेतला आढावा,योग हा केवळ एक व्यायाम नाही तर शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील एकतानता साधण्याचा मार्ग: केंद्रीय मंत्री जुआल ओराम.

पोलीस दलाने व्हिडिओ पार्लर, कॅसिनोंची तपासणी करावी -पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ टास्क फोर्सच्या सहाव्या बैठक..

vishwatmaklokswamivarta