vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

आरोग्य तपासणी अभियानाचा घरेलू कामगारांनी लाभ घ्यावा..

आरोग्य तपासणी अभियानाचा घरेलू कामगारांनी लाभ घ्यावा..

 

     : सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यात एकूण 7 हजार 77 घरेलू कामगारांची नोंद असून त्यामध्ये जवळपास 99 टक्के महिला आहेत. त्यांच्यासाठी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नित रूग्णालये व 29 धर्मादाय रुग्णालयांकडून दिनांक 14 मे 2025 रोजी घरेलू कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या अभिनव उपक्रमाचा घरेलू कामगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

घरेलू कामगारांची मोफत आरोग्य तपासणीबाबत आढावा बैठक उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ, कामगार आयुक्त एम. ए. मुजावर, मा. पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते.

   18 वर्षे पूर्ण केलेल्या परंतु 60 वर्षे पूर्ण न झालेल्या घरेलू कामगारांची नोंदणी कामगार विभागाकडून करण्यात येते. अशा नोंदणी असलेल्या घरेलू कामगारांची यादी तयार करुन जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये व 29 धर्मादाय रुग्णालयांकडून त्यांच्या सर्व आरोग्य विषयक प्राथमिक तपासण्या करण्यात येणार आहेत. प्राथमिक तपासणीमध्ये काही आजार आढळल्यास त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येईल, दिनांक 14 मे 2025 रोजी सांगली शहरासाठी मालू उच्च माध्यमिक शाळा, शिवाजीनगर, गुलमोहर कॉलनी, सांगली येथे, मिरज शहरासाठी उच्च माध्यमिक शाळा, किल्ला भाग, मिरज येथे व ग्रामीण भागासाठी तालुकास्तरीय ग्रामीण रुग्णालय व उप जिल्हा रुग्णालय येथे तपासणी अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील रुग्णांनी आता घर बसल्या मोफत बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

आरोग्य क्रांतीकडे गडचिरोलीची वाटचाल!  ​’माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेत जिल्ह्यातील ४५९ ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग 

दिव्यांग बालकांच्या तपासणी शिबिरांचे आयोजन

विशेष लेखः-मुलींच्या जन्माकडे सकारात्मकतेने बघा-:

vishwatmaklokswamivarta

महिलांच्या आरोग्याच्या दिशेने बुलढाण्यात महत्वाचे पाऊल-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील* एचपीव्ही लसीकरण मोहीम लवकरच सुरू   * 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना मोफत लस

vishwatmaklokswamivarta

एचपीव्ही लसीकरणाचे महत्व प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- एचपीव्ही लसीकरणाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका, शंका असल्यास अधिकृत वैद्यकिय  व्यवसायिकांचा सल्ला घ्या- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 28 जून 2026 रोजी..