vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

मेनोपॉजल वुमन्स सोसायटीमार्फत सार्वजनिक आरोग्य विभाग व विलासराव देशमुख फाउंडेशन लातूर यांच्या माध्यमातून रजोनिवृत्ती नंतरच्या स्त्रियांमध्येअसंसर्गजन्य आजारांवर संशोधन..

मेनोपॉजल वुमन्स सोसायटीमार्फत सार्वजनिक आरोग्य विभाग व विलासराव देशमुख फाउंडेशन लातूर यांच्या माध्यमातून रजोनिवृत्ती नंतरच्या स्त्रियांमध्येअसंसर्गजन्य आजारांवर संशोधन..

 

प्रतिनिधी प्रतिनिधी

युनायटेड नेशन्सने शाश्वत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी 2023 च्या कार्यसूचीमध्ये असंसर्गजन्य आजार ही एक प्रमुख आरोग्य समस्या म्हणून नोंद घेतली आहे. त्यांच्या पाहणीनुसार एकूण मृत्यूपैकी 71%मृत्युसाठी असंसर्गजन्य आजार मुख्य कारण आहे. त्यापैकी कार्डीओ व्हास्कुलर,आजारांमुळे दरवर्षी जवळजवळ १८ दशलक्ष मृत्यू होतात. त्यामध्ये हृदयविकार आणि पक्षाघात हे विकसित देशातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे.

जवळजवळ ३५% स्त्रिया दरवर्षी या आजारांमुळे प्रभावित होतात, त्यामुळे यावर विशेष शोधप्रबंध अभ्यास करण्यासाठी विशेष प्रकल्प पोस्ट मेनोपॉजल वुमन्स सोसायटीमार्फत लातूर जिल्ह्यामध्ये राबविण्यात आला. हा प्रकल्प सार्वजनिक आरोग्य विभाग, लातूर व विलासराव देशमुख फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्यातून पूर्ण करण्यात आला. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये, पोस्ट मेनोपॉजल

वुमन्स सोसायटी व विलासराव देशमुख फाउंडेशन आणि सार्वजनिक आरोग्य विभाग,

लातूर यांच्या

संयुक्त विद्यमाने-रजोनिवृती नंतर स्त्रियांमध्ये उद्भवणाऱ्या

असंसर्गजन्य आजारांबद्दल संशोधनासाठी अभ्यास करण्यात आला. हा आरोग्यदायी

उपक्रम टवेन्टिवन ॲग्री ली. च्या संचालीका अदिती अमित देशमुख यांच्या

संकल्पनेतून राबविण्यात आला.

यामध्ये ग्रामीण भागातील रजोनिवृत्ती वयाच्या जवळील असणाऱ्या एकूण ४००

महिलांचा अभ्यासामध्ये समावेश करण्यात आला. सुरुवातीला संबंधित भागातील

आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण

घेण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभागातील त्रिस्तरीय रचनेनुसार – आरोग्य

उपकेंद्र – हरंगुळ बु., प्राथमिक आरोग्य केंद्र – गंगापूर आणि ग्रामीण

रुग्णालय – बाभळगाव या संस्थांच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असणाऱ्या

तीन गावातील – ४०

वर्षांवरील महिलांची निवड करण्यात आली. रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये

विविध हार्मोनल चढउतार होतात. त्यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिकरित्या

महिलांमध्ये रजोनिवृत्ती पर्यंत असणारे विविध आजारांचे कवच हे,

रजोनिवृत्ती नंतर नसते. त्यामुळे महिलांना विशेषतः भावनिक चढउतार आणि

असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. म्हणून सदर महिलांची आरोग्य उपकेंद्र,

प्राथमिक आरोग्य केंद्र व

ग्रामीण रुग्णालय संबंधितस्तरावर आरोग्याच्या विविध तपासण्या करण्यात

आल्या. ज्या तपासण्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेमध्ये उपलब्ध नव्हत्या,

त्या बाहेरुन करण्यात आल्या. त्यानंतर तपासण्यांच्या निष्कर्षाचा अभ्यास

करण्यात आला. अभ्यासामध्ये विशेषतः डिस्लिपिडेमिया,

ऑस्टियोपेनिया, मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्चरक्तदाब यांचे प्रमाण अनुक्रमे

58%,५०%,25%,25% आणि २०% असे आढळले. जे की पाश्चात्य देशातील

प्रमाणापेक्षा खूप कमी आहे. याकरिता विविध कौटुंबिक, सामाजिक, वैचारिक,

आर्थिक घटक हे कारणीभूत आहेत. या अभ्यासामध्ये असे आढळून आले की

सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने –

असंसर्गजन्य रोगांचे लवकर निदान होणे, वेळेवर संदर्भ सेवा देणे आणि योग्य

वेळी वेळेवर उपचार करणे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारे (Artificial

intelligence) स्कीनिंग

साधनाचा वापर करून जोखीम असलेल्या महिलांच्या तपासणी करिता ही पद्धत खूप

फायदेशीर आहे. सदरील प्रकल्प सार्वजनिक आरोग्य विभाग, लातूर व विलासराव

देशमुख फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्यातून पूर्णत्वास नेणे शक्य झाले,

यामुळे पोस्टमेनोपॉझल वुमन सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. दुरु शहा यांनी

सर्वांचे विशेष आभार मानले आहेत. या प्रकल्पाच्या यशस्वीते करीता

विलासराव देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या

वतीने तत्कालीन एनसीडी कॉर्डिनेटर यांच्यासह संबंधित आरोग्य संस्था

स्तरावरील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांचे

सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

————-

संबंधित पोस्ट

पनवेल येथे दुचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांकासाठी नवीन मालिका सुरु

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडूनशहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

नुकसानग्रस्त भागातील शेतीशिवाराची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी**एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे”काळजी करू नका, शासन आपल्या सोबत…*

vishwatmaklokswamivarta

द्विज गादेवाड ने राष्ट्रीय तायक्वॉदो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवला

vishwatmaklokswamivarta

सेल्को फाउंडेशन’च्या सहकार्याने १८ जिल्ह्यांत,प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौर ऊर्जीकरणसौर ऊर्जेच्या वापरामुळे दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी७३ कोटी ९१ लाख ४३ हजाराच्या मदतीस मान्यताØ आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभेØ मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta