vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कलिना संकुलामधील सोयी-सुविधांच्या पाहणीसाठी विधिमंडळ सदस्यांची समिती- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

कलिना संकुलामधील सोयी-सुविधांच्या पाहणीसाठी विधिमंडळ सदस्यांची समिती- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

 

 

            मुंबई, प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठ हे जगातील मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे. या विद्यापीठाचा जगात नावलौकिक आहे. विद्यापीठाचे कलिना संकुलामध्ये मुलींसाठी वसतिगृह आहे. या वसतिगृहातील सुविधांबाबत विद्यार्थिनीच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर संपूर्ण कॅम्पस मधील सोयीसुविधा, स्वच्छता तसेच वसतिगृहातील सुविधा याबाबतची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती कॅम्पसला भेट देवून येथील सुविधांची पाहणी करेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत आज सांगितले.

 

याबाबत सदस्य ॲड. पराग अळवणी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, आशिष शेलार, असलम शेख यांनी भाग घेतला.

 

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, अनेक विद्यापीठ आता स्वायत्त आहेत. विद्यापीठ प्रशासन, त्यांच्या व्यवस्थापनावर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येईल. कलिना संकुल परिसराचा विकास करण्यासाठी शासनाकडे तीन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. याबाबत प्रस्तावाचे सादरीकरण घेवून योग्य प्रस्तावाची निवड करण्यात येईल. त्याद्वारे या परिसराचा विकास करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

 

0000

संबंधित पोस्ट

देशातील सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

vishwatmaklokswamivarta

विशेष लेखः-मुलींच्या जन्माकडे सकारात्मकतेने बघा-:

vishwatmaklokswamivarta

पाटण तालुक्यातील दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पाचे   – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

रूपी को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड चं लायसन्स रद्द,RBI च्या कारवाईमुळे 22 सप्टेंबर पासून बॅंकेला कायम बंद

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण अर्थकारणाची उत्तम जाण असलेला नेता हरपला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबीयांचे मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन

vishwatmaklokswamivarta

ठाणे शहरात ३ बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई