vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

9.02 % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, 2024 ची परतफेड

9.02 % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, 2024 ची परतफेड

 

 

 

            मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 9.02 % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, 2024 अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि. 12 ऑगस्ट 2024 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि.13 ऑगस्ट 2024 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

 

सुटी जाहीर केल्यास कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. 13 ऑगस्ट 2024 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

 

शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

 

तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ९.०२% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस ” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.”, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

 

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केलें जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे. रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील.

 

००००

संबंधित पोस्ट

ठाणे येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरितादि.08 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

भूकंपविषयक आपत्ती व्यवस्थापनाची १७ फेब्रुवारी रोजी रंगीत तालीम; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन• राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक राहणार उपस्थित

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वर्किंग वुमेन्स होस्टेल वओल्ड एज होम उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करा- गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून म्हाडाच्या कामकाजाचा आढावा…

vishwatmaklokswamivarta

शाळेचा एक दिवस रस्ता सुरक्षेसाठी रस्ता सुरक्षेचा संदेश गावपाड्यापर्यंत..

बाळापूर तालुक्यातील वीटभट्ट्यांची प्रदूषणाच्या दृष्टीने फेरतपासणी- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून दोन महिन्यात 14 लाख 45 हजार रुपयांची मदत.. – जिल्हा स्तरावरच मदत मिळत असल्याने रूग्णांना दिलासा