vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गोर-गरीबांसाठी वेळप्रसंगी आंदोलनातून आक्रमक भुमिका – अ‍ॅड. भास्कर मगरे,बदनापूर तालुकास्तरीय भुमिहिन, बेघर, निराधारांचा मेळावा संपन्न..

गोर-गरीबांसाठी वेळप्रसंगी आंदोलनातून आक्रमक भुमिका – अ‍ॅड. भास्कर मगरे,बदनापूर तालुकास्तरीय भुमिहिन, बेघर, निराधारांचा मेळावा संपन्न..

 

बदनापूर : शिवसेना दलित आघाडीच्या वतीने भुमिहिन, बेघर, निराधारासाठी गेली अनेक वर्षांपासून रस्त्यावरचा संघर्ष करीत असून उपेक्षित समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न करीत असल्याचे शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी सांगितले.आज बदनापूर तालुकास्तरीय भुमिहिन, बेघर, निराधारांचा मेळावा संपन्न झाला.

त्यावेळी नागरिकांशी संवाद साधतांना अ‍ॅड.मगरे बोलत होते. पुढे बोलतांना

ते म्हणाले की, सातत्याने तीन वर्षे शिवसंपर्क अभियान जालना जिल्ह्यात

राबवून गाव,वाडी, तांडा, वस्तीमधील वंचितांना केंद्र व राज्य शासनाच्या

योजनांचा प्रामाणिकपणे लाभ मिळवून देण्यात आला. तोच प्रयत्न आणि

शिवसंपर्क सामाजिक अभियान भविष्यात राबविण्याचा मानस असल्याची भावना

बदनापूर तालुकास्तरीय मेळाव्यात अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी व्यक्त केला.

तसेच भुमिहिन, बेघर, निराधार आणि बेरोजगार तरुणांसाठी प्रयत्न करुन

वेळप्रसंगी आंदोलनातून आक्रमक भुमिका घेवून न्याय मिळविल्याशिवाय थांबणार

नसल्याचे अ‍ॅड. मगरे यांनी सांगितले. तसेच उद्या अंबड येथे भुमिहिन,

बेघर, निराधार मिळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. मगरे यांनी

दिली. यावेळी रामचंद्र पंडित,सतीश साबळे, प्रमोद साबळे,राजू साबळे, अतुल

साबळे,राहुल साबळे, प्रदीप कुलकर्णी यांच्यासह तालुक्यातील भुमिहिन,

कास्तकर, बेघरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

००००००००००

फोटो ओळी…..

-बदनापूर तालुकास्तरीय भुमिहिन, बेघर, निराधारांचा मेळाव्यात बोलतांना

दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे.

संबंधित पोस्ट

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024निवडणूक विषयक राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक  : जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग-मतदारांसाठी जनजागृत्तीपर कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

डाक विभागात एजंटसाठी अर्ज मागविले; 17 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस पेरण्या समाधानकारक

मुंबईकरांचे आयुष्य आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक – मिलिंद म्हस्के कार्यकारी अधिकारी प्रज्ञा फाउंडेशन

vishwatmaklokswamivarta

राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री  राधाकृष्ण विखे- पाटील आढावा 

vishwatmaklokswamivarta