vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस पेरण्या समाधानकारक

राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस पेरण्या समाधानकारक

 राज्य प्रतिनिधी

राज्यात सरासरीच्या १२३.२ टक्के पाऊस झाला असून पेरण्या देखील समाधानकारक झाल्या आहेत. या संदर्भातील सादरीकरण आज कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत केले.

 

राज्यात २२ जुलै पर्यंत ५४५ मि.मी. पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच सुमारास ४२२ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या ९५.४ टक्के पाऊस झाला होता. राज्यात खरीपाचे ऊस वगळून १४२.२ लाख हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत १२८.९४ लाख हेक्टर क्षेत्रावर (९१ टक्के) पेरणी झाली आहे. भात व नाचणी पिकाची पुर्नलागवड कामे सुरु असून ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, भुईमूग आणि कापसाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. खत आणि बियाणांची पुरेशी उपलब्धता आहे.

 

पाणी साठा :

 

सध्या राज्यातील सर्व धरणांमध्ये ३९.१७ टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ४३.६५ टक्के पाणी साठा होता. सर्वात कमी म्हणजे १२.१३ टक्के पाणी साठा छत्रपती संभाजीनगर येथे तसेच २८.३४ टक्के नाशिक येथे आहे. राज्यातील १ हजार २१ गावे आणि २ हजार ५१८ वाड्यांना १ हजार ३६५ टँकर्सद्धारे पाणीपुरवठा सुरु आहे. टँकर्सची संख्या ३२६ ने वाढली आहे.

संबंधित पोस्ट

शिष्यवृत्तीचे अर्ज 15 जून पर्यंत भरण्याचे आवाहन…

विधानसभानिवडणूक२०२४- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार.. आचारसंहिता लागू

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार जाहीर महाराष्ट्र ठरला सहा पद्मभूषण तर सहा पद्मश्रींचा मानकरी

vishwatmaklokswamivarta

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले; दोन्ही गटांना मिळणार नव्या चिन्हासाठी पर्याय

vishwatmaklokswamivarta

प्रशासकीय अधिकारी शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नाहीत- दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे,तालुकास्तरीय दलित आदिवासी भुमिहिन कार्यकर्ता मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद :

डॉ. तारा भवाळकर यांच्या निवडीचा साहित्यप्रेमी म्हणून सर्वाधिक आनंद -साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निवासस्थानी भेटून केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta