vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

आगामी विधानसभा निवडणूक:जालन्यातून आमदार गोरंट्याल, शेख महेमूद, अब्दुल हफीज आदींचे काॅंग्रेसकडे इच्छूक म्हणून अर्ज दाखल..

आगामी विधानसभा निवडणूक:जालन्यातून आमदार गोरंट्याल, शेख महेमूद, अब्दुल हफीज आदींचे काॅंग्रेसकडे इच्छूक म्हणून अर्ज दाखल..

 

जालना- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जालना विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल, शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमूद, माजी शहराध्यक्ष अब्दुल हफीज, ओबीसी राष्ट्रीय विभागाचे समन्वयक राजेंद्र राख यांच्यासह सात जणांनी इच्छूक उमेदवार म्हणून महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीकडे आपले अर्ज दाखल केले आहेत.

जालना नगर पालिकेवर सलग तीन वेळा निवडून गेलेले काॅंग्रेस पक्षाचे गटनेते गणेश राऊत, काॅंग्रेस कमिटीचे जालना तालुकाध्यक्ष वसंत राजे जाधव, राज वक्फ बोर्डाचे माजी सदस्य मौलाना सय्यद जमील रझवी यांनीही काॅंग्रेस पक्षाकडे जालना विधानसभा मतदारसंघातून इच्छूक म्हणून अर्ज दाखल केले आहेत. हे अर्ज दाखल करतांना पक्षनिधीही जमा करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे दिनांक 10 ऑगस्ट पर्यंत विधानसभा मतदारसंघ संघातील इच्छूक उमेदवारांचे अर्ज दाखल करता येणार आहेत.

जालना विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार कैलास गोरंट्याल हे 1999 , 2009 व 2019 मध्ये काॅंग्रेस पक्षाकडून जालना विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले आहेत. काॅंग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमूद यांनी तीन वेळा निवडून आलेले कैलास गोरंट्याल यांच्या विजयासाठी अथक परिश्रम घेतले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या विजयासाठीही शेख महेमूद यांनी निवडणूक प्रचाराचे योग्य नियोजन करून अथक परिश्रम घेतले होते. महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे जालना जिल्ह्यातील अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात.

जालना विधानसभा मतदारसंघातून इच्छूक म्हणून अर्ज दाखल केलेले अब्दुल हफीज हे जालना शहर काॅंग्रेसचे अध्यक्ष होते. शिवाय जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षही होते. सामाजिक कार्यात ते सतत पुढाकार घेत असतात. राजेंद्र राख हे काॅंग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय समन्वयक आहेत, जालना जिल्ह्यातील ओबीसी नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 28.34 टी.एम.सी. पाणीसाठा

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यशस्वी होण्यासाठी निरंतर वाचन आवश्यक- कुंडलिकराव अतकरे

vishwatmaklokswamivarta

शामराव पेजे महामंडळाच्या कर्ज योजनांचा इतर मागासवर्गातील तरुणांनी लाभ घेण्याचे आवाहन

भारतीय रिझर्व्ह बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा अग्रणी बँकेच्यावतीने घोषवाक्य लेखन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

vishwatmaklokswamivarta

ऑटो-रिक्षा चालक व मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सदनात जागतिक पाक संस्कृतीचा संगम विविध देशातील ३० दिग्गज शेफकडून राज्याच्या आदरातिथ्याचा गौरव