vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना : गरीब कुटुंबांना मिळणार 3 गॅस सिलेंडर मोफत योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी 

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना : गरीब कुटुंबांना मिळणार 3 गॅस सिलेंडर मोफत योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

 

जालना, प्रतिनिधी – राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना राज्य शासनाने जाहिर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या सुचनेनुसार मंगळवारी (दि.6) अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच योजनेपासून कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधीतांनी घेण्याची सूचना श्रीमती मेत्रेवार यांनी केली.

 

बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. डी.एस. दिवटे, ऑईल कंपन्यांचे सेल्स ऑफिसर, गॅस एजन्सीचे प्रतिनिधी व तहसील कार्यालयांचे कर्मचारी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडरचे पुनर्भरण तेल कंपन्यांमार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

 

लाभार्थ्यांची पात्रता- या योजनेतंर्गत जिल्ह्यातील उज्वला योजनेचे लाभार्थी तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (रिफिल) मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एका कुटुंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल. सदर लाभ केवळ 14.2 कि.ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय

 

राहील.

 

कार्यपध्दती -सदर योजनेची सबसीडी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) द्वारे जमा करण्यात येणार असल्यामुळे ई-केवायसी करणे आवश्यक आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती चौधर यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

पशुधन पर्यवेक्षकास उपसरपंचाची जबर मारहाण नाव्हा येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात ध्वजारोहण केल्याचा राग सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्हा दाखल 

स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या पाचमध्ये असावा – पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र : राज्यातील 600 तहसीलदार आणि 2200 नायब तहसीलदार आजपासून संपावर…

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्याना मदत करण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य· मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील· अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार निधी वितरणास मान्यता

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांची कोपरी ‍ विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट..स्ट्राँग रूम, मतमोजणी कक्ष, नामनिर्देशनबाबतच्या तयारीचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा पाणी स्वच्छता मिशन समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta