vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दहीहंडी गोपाळांना ‘विमाकवच’ केंव्हा मिळणार?बोगस दहीहंडी असोसिएशन रद्द करावे, अन्यथा धर्मादाय आयुक्तांना घेराव घालणार

दहीहंडी गोपाळांना ‘विमाकवच’ केंव्हा मिळणार?बोगस दहीहंडी असोसिएशन रद्द करावे, अन्यथा धर्मादाय आयुक्तांना घेराव घालणार

 

सुरेश गायकवाड याच कडून

मुंबई – दहीहंडी उत्सवाला काही दिवस उरले असताना ‘महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन ‘ हे नियमबाह्य असून ही या असोसिएशनला विमा कंपनीच्या माध्यमातून सरकार आता ७५ लाख रुपये देणार आहे. अशा नवीन संस्थेला धर्मादाय आयुक्त यांनी नोंदणी देताना नियमांना व कायद्याला बगल दिली आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी नियमबहाय संस्था रद्द करावी अन्यथा धर्मादाय आयुक्तांना २ /३ दिवसात घेराव घातला जाईल, असा इशारा ही त्यांनी दिला. कारण नियमबाह्य संस्थेकडून गोविंदाना विमा कवच अद्यापही मिळाले नाही. ज्यांची नुकतीच स्थापना झाली आहे असा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष अरुण पाटील यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.

 

यावर्षी ७५,००० ( पंच्याहत्तर हजार ) गोविंदांचा इन्शुरन्स जाहीर केला आहे. परंतु १८ दिवस शिल्लक असताना अजून सुद्धा गोपाळांचे इन्शुरन्स काढण्यात आलेला नाही. सन २०२३ ला शासनातर्फे दहीहंडी समन्वय समितीच्या नावे जीआर काढला होता. यावर्षी २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन यांच्या नावे जीआर काढल्यामुळे सर्व गोविंदा पथकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे असे प्रमुख सल्लागार गुरू गौरव शर्मा यांनी सांगितले.

 

नवीन असोसिएशन कधी व केव्हा स्थापन झाले हे गोविंदा पथकांना माहिती नाही. धर्मदाय आयुक्त कार्यालयात नियमबाह्य नोंदणीकृत करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणी रद्द करावी अन्यथा येत्या दोन दिवसात धर्मदाय आयुक्त वरळी कार्यालयावर गोविंदा पथक आंदोलन करणार असे सचिव कमलेश भोईर यावेळी सांगितले.

संबंधित पोस्ट

ठाणे विकास परिषद-2024”बुद्धी आणि उपलब्ध साधनसामग्रीचा कल्पकतेने वापर करूनठाणे शहराचा होणार सर्वांगीण विकास-श्री.प्रवीणसिंह परदेशी

vishwatmaklokswamivarta

हळद पीक जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद.कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते उद्धाटन

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, विश्रामगृहपरिसरात मिरवणूका काढणे, घोषणा देण्यास निर्बंध…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी एक हजार पंधरा तरुणांनी उभारले स्वतःचे उद्योग…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने बँक खाते व्यवहारांवर राहणार करडी नजर*

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर 30 हजार 868 जणांची नियुक्ती:

vishwatmaklokswamivarta