vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर 30 हजार 868 जणांची नियुक्ती:

जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर 30 हजार 868 जणांची नियुक्ती:

 

राज्य प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील 6 हजार 955 मतदान केंद्र असून या प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई व पोलीस कर्मचारी असे पथक मतदानाच्या दिवशी कार्यरत असणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 6 हजार 955 मतदान केंद्रावर एकूण 7 हजार 717 मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1- 7 हजार 717, इतर मतदान अधिकारी – 15 हजार 434 अशा एकूण 30 हजार 868 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर करावयाची कामे याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून मतदान केंद्रावरील सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

मतदान केंद्रांवर सुविधा उपलब्ध:

मतदारांना मतदान सहजतेने करता यावे यासाठी सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असणार आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय, रांगेत उभे असणाऱ्या मतदारांसाठी खुर्च्यांची सोय, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हील चेअरची सुविधा, रॅम्पची सोय, वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालये आदी सुविधा करण्यात येणार आहे. तसेच एकाच ठिकाणी अनेक मतदान केंद्रे असल्यास मतदान चिठ्ठीवर विविध रंगाचा वापर करण्यात येणार आहे. जेणेकरुन मतदारांचा मतदान करण्यासाठीचा वेळ वाचणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया नि:पक्षपाती, निर्भयपणे व शांततेत पार पाडाव्यात यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सज्ज झाले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणूक अधिकारी श्री.शिनगारे यांनी सांगितले.

मतदान केंद्रांचे होणार वेबकास्टिंग:

जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील एकूण 6 हजार 955 पैकी महापालिका हद्दीतील 5 हजार 821 तर ग्रामीण भागातील 714 मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा असणार आहे.

निवडणूककामी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. दि.19 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व मतदान केंद्रावर मतदान पथके रवाना होतील.

दिव्यांग व ज्येष्ठांसाठी सुविधा उपलब्ध:

अंध दिव्यांग मतदारांना सर्व मतदार केंद्रावर रॅम्प, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून “सक्षम प्रणालीद्वारे” विनंती करण्यात आलेल्या दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली असून दिव्यांगांना रांगेत उभे न राहता मतदान करता येणार आहे. तसेच ज्येष्ठ मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा देखील प्रत्येक मतदान केंद्रावर करण्यात आली आहे.

00000

संबंधित पोस्ट

कोकणातील हृदय पिळवटून टाकणारी घटना: कुमारी आर्या चव्हाण हिच्या क्रूर हत्येचा तारळेत तीव्र निषेध मोर्चा..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत -मोफत हृदय शस्त्रक्रियेकरिता 22 बालके मुंबईला रवाना

vishwatmaklokswamivarta

रोहयो’ अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी- रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी पीककर्ज व किसान क्रेडीट कार्डसाठी ‘जनसमर्थ’ पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करावेत  -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी क्रीडा मंत्र्यांकडून जिमनॅस्ट संयुक्ता काळे हिला शुभेच्छा “महाराष्ट्राची हिरकणी” म्हणून गौरव – क्रीडा सोयीसुविधांसाठी थेट संपर्क साधण्याचे आवाहन

अन्न सुरक्षिततेकडून पोषण सुरक्षेकडे“ठाणे मिलेट महोत्सव” दि.5 ऑक्टोबर रोजी