vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज-नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करुनराष्ट्रीय कर्तव्य पार पडावे-जिल्हा ‍निवडणूक अशोक शिनगारे

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज-नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करुनराष्ट्रीय कर्तव्य पार पडावे-जिल्हा ‍निवडणूक अशोक शिनगारे

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी- विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात मतदान होत आहे. ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची कामे युद्ध पातळीवर सुरू झाली. ठाणे जिल्ह्यात 134 भिवंडी ग्रामीण, 135 शहापूर (अ.ज.), 136 भिवंडी पश्चिम, 137 भिवंडी पूर्व, 138 कल्याण पश्चिम, 139 मुरबाड, 140 अंबरनाथ, 141 उल्हासनगर, 142 कल्याण पूर्व, 143 डोंबिवली, 144 कल्याण ग्रामीण, 145 मिराभाईंदर, 146 ओवळा माजिवडा, 147 कोपरी पाचपाखाडी, 148 ठाणे, 149 कळवा-मुंब्रा, 150 ऐरोली, 151 बेलापूर या 18 मतदारसंघाचा समावेश आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय 18 ‍ निवडणूक निर्णय अधिकारी व 18 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.

ठाणे जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रत्येक मतदारसंघात स्वीपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली असून निश्चितच याचा परिणाम मतदान वाढीवर होणार आहे.

सहा मतदारसंघात दोन बॅलेट युनिट:

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून एकूण 244 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील 138 कल्याण पश्चिम, 140 अंबरनाथ (अ.जा), 141 उल्हासनगर, 142 कल्याण पश्चिम, 145 मीरा भाईंदर, 150 ऐरोली विधानसभा या 6 मतदारसंघातील निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी दोन बॅलेट युनिट असणार आहेत.

जिल्ह्यात 6955 मतदान केंद्रे सज्ज:

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 6894 ही मूळ मतदान केंद्रे व 61 सहायकारी मतदान केंद्रे अशी एकूण 6955 मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत. या मतदान केंद्रांवर एकूण 8273 बॅलेट युनिट, 8273 कंट्रोल युनिट तर 8962 व्हीव्हीपॅट लागणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर लागणाऱ्या मशीन्सची सरमिसळही उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी समक्ष झाली असून मतदान केंद्रावरील सर्व मशीन सीलबंद करण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणूक अधिकारी श्री.अशोक शिनगारे यांनी दिली.

संबंधित पोस्ट

राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून विभागाच्या कामाचा आढावा

शासनाने शिधापत्रिका (राशन कार्ड) पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावे – सय्यद अश्फाक अली सर्व साधारण जनतेची पिळवणुक तात्काळ थांबविणे.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी’ कायदा -तात्काळ करण्याच्या मागणीला जोर धरला !हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राज्यभर ठिकठिकाणी प्रशासनाला निवेदने

vishwatmaklokswamivarta

 जिल्हा परिषद, ठाणे राज्यात प्रथम क्रमांकावर; ‘कार्यालयीन मूल्यमापन’ मोहिमेत मिळवला गौरव-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

मुंबईकरांसाठी खुशखबर : म्हाडा मुंबई लॉटरी घरांच्या किंमतीमध्ये मोठी कपात, EWS, LIG, MIG आणि HIG श्रेणींसाठी नवीन दर जाहीर..