vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईकरांसाठी खुशखबर : म्हाडा मुंबई लॉटरी घरांच्या किंमतीमध्ये मोठी कपात, EWS, LIG, MIG आणि HIG श्रेणींसाठी नवीन दर जाहीर..

मुंबईकरांसाठी खुशखबर म्हाडा मुंबई लॉटरी घरांच्या किंमतीमध्ये मोठी कपात, EWS, LIG, MIG आणि HIG श्रेणींसाठी नवीन दर जाहीर..

 

राज्य प्रतिनिधी

मुंबईकरांसाठी खुशखबर कमी किमतीत परवडणारी घरे त्यामध्ये मुंबईकरांसाठी आणखी एक खुशखबर होणार आहे यावेळी मुंबई म्हाडा विभागाने लॉटरी करिता मोठी कपात केली आहे त्याचे नवीन दर या प्रकारे जाहीर करण्यात आले आहेत

राज्य सरकारने लक्षणीय कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया मंच एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली. किमतीतील कपात विशेषत: कलम 33(5) आणि 33(7) अंतर्गत अधिग्रहित केलेल्या अतिरिक्त सदनिकांना लागू असेल. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांनी सरकारी निर्णयाची माहिती देताना सांगितले की, “सध्याच्या मुंबई लॉटरीसाठी घोषित किमतीवर म्हाडाच्या घरांच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केले .

निर्णय फक्त कलम 33(5) आणि 33(7) अंतर्गत मिळालेल्या अतिरिक्त सदनिकांना लागू होते.” सुधारित किमतीतील कपात खाली येथे देण्यात आली आहे.

मुंबई लॉटरीसाठी घोषित किमतीवर म्हाडाच्या घरांच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. किंमत कपातीचा निर्णय केवळ फक्त कलम 33(5) आणि 33(7) अंतर्गत मिळालेल्या अतिरिक्त सदनिकांना लागू आहे.” सुधारित किमतीतील कपात पुढीलप्रमाणे आहेत.@ आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (EWS): 25% कपात@ निम्न उत्पन्न गट (LIG): 20% कपात@ मध्यम उत्पन्न गट (MIG): 15% कपात@ उच्च उत्पन्न गट (HIG): 10% कपात

म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी माहिती देताना सांगितले की, या गृहनिर्माण युनिट्सची लॉटरी येत्या काही दिवसांत अंतिम घोषणेसह सप्टेंबरमध्ये काढणे अपेक्षित आहे. या योजनेंतर्गत फ्लॅट्स मुंबईतील मालाड, पवई, विक्रोळी, गोरेगाव आणि वडाळा या प्रमुख ठिकाणी उपलब्ध असतील. म्हाडाने देखील पुष्टी केली की घरांचे वाटप लॉटरी पद्धतीने केले जाईल, निकाल 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाईल. गृहनिर्माण सोडतीसाठी अर्ज 9 ऑगस्टपासून सुरू झाले, आणि अंतिम मुदत 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे

संबंधित पोस्ट

काँग्रेस नेते राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट, काँग्रेसने आधीच दर्शवला आहे पाठिंबा

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत PM मोदी देणार ‘विजय मंत्र’; विधानसभा निवडणुकांसमवेत अनेक मुद्यांवर चर्चा

vishwatmaklokswamivarta

विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहचली जालना जिल्ह्यात; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले उदघाटन

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग, नियोजन विभाग आयोजित  बचत गटामार्फत महिला मंडळाने तयार केलेल्या उत्पादित वस्तू चे भव्य प्रदर्शन आणि विक्री दोन दिवसीय प्रदर्शन विक्री कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुंबईपोलिस यांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाची कारवाई , साडेतेवीस लाख रुपये किमतीच्या अमली पदार्थांसह दोन तरुण अटकेत..

vishwatmaklokswamivarta

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ऑनलाईन नोंदणीला सुरुवात…

vishwatmaklokswamivarta