vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईपोलिस यांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाची कारवाई , साडेतेवीस लाख रुपये किमतीच्या अमली पदार्थांसह दोन तरुण अटकेत..

मुंबईपोलिस यांच्या अमलीपदार्थ विरोधी  पथकाची कारवाई ,साडेतेवीस लाख रुपये किमतीच्या अमली पदार्थांसह दोन तरुण अटकेत..

मुंबई प्रतिनिधी : तरूण मंडळी चे सेवन करण्याबरोबरच  ड्रग्स विक्री करण्यातही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याचे एका घटनेतून समोर आले आहे माहीम येथील भागोजी कीर मार्ग जवळच्या पॅराडाईज सिनेमा जवळ दि १६/७/२०२१ रोजी २१:१० वा एक इसम संशयास्पद हालचाली करत असताना वरळी अमली पदार्थ विरोधी पथकाला गस्त घालत असताना दिसून आल्याने एन डी पी एस कायद्यातील तरतुदीनुसार दोन पंचांसमक्ष सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ पावडर सारखा दिसणारा पदार्थ आढळून आला त्या इसमाची कसून चौकशी केली असता हा पदार्थ म्हणजे एम डी मेफड्रोन नावाच (ड्रग्स) अमली पदार्थ असल्याचे आढळून आले.

या इसमा जवळ एकूण 70 ग्राम अमली पदार्थ मिळून आला. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या अमली पदार्थाची किंमत ७ लाख रुपये इतकी आहे. परंतु पोलिस एवढ्यावर न थांबता अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या पर्यंत पोचायचे ठरवले त्याप्रमाणे पोलिसांनी पुढील चौकशीला सर्वात केली असता

त्या इसमाची माहिती व ठावठिकाणा प्राप्त करून एस व्ही रोड मालाड पश्चिम येथील नाडियाद्वाला कॉलनी न २ बि/५ पहिला मजला सत्यनिवास नं १ या ठिकाणी छापा टाकून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दुसऱ्या इसमाची एन डी पी एस कायद्यातील तरतुदीनुसार दोन पंचांसमक्ष अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ सुद्धा १२ लाख रुपये किमतीचे १२० ग्राम एम डी mefdron (ड्रग) हा अमली पदार्थ मिळून आला  त्या व्यक्तीजवळ आणखी साडेचार लाख रुपये किमतीचे १५ ग्राम कोकिन हा अमली पदार्थ मिळून आला या दोघांन विरोधात गु र क्र ६२/२०२१, कलम ८-(क) सह (२२) क (२१) ब २९ एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला दोन्ही आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २२/७/२०२१ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे

प्रथम क्रमांकाचा आरोपी एस व्ही रोड मालाड पश्चिम येथील नाडियाद्वाला कॉलनी न २ बि/५ पहिला मजला सत्यनिवास नं १ या ठिकाणी राहत असून हा आरोपी गेले सहा-सात वर्षांपासून अमली पदार्थाची खरेदी-विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे तर हा आरोपी मालाड पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यवर २०१२ पासून  ४ मारामारीचे गुन्हे तर एक अग्निशस्त्र जवळ बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे तसेच

आरोपी नंबर २ हा आरोपी वय २० वर्षे पुरुष इसम असून ओम सिद्धी को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी चिंचोली बंदर सोमवार बाजार मालाड पुर्व येथे राहण्यास असून तो   क्रमांक एक आरोपी याच्या जवळ अमली पदार्थ विक्री करण्याचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे ह्या दोन जणांकडे आढळून आलेला अमली पदार्थ ऐक नायजेरीयन व्यक्ती ह्यांना पुरवत असल्याची माहिती पोलिसां समोर आली आहे पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरू केला आहे

सदरची कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी मुंबई यांनी केली आहे

संबंधित पोस्ट

शिष्यवृत्ती लाभार्थी संख्येत वाढीसाठी प्रस्ताव सादर करावा- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

ठाणे परिसरात मतदान जनजागृतीसाठी हिरानंदानी परीसरात मतदार जोडो पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एसआरएतील गृहविक्री नियमात बदल, आता 7 वर्षांमध्येही विकता येणार- राज्य सरकार  

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त विशेष ग्रामसभा व जनजागृती उपक्रमांचे आयोजन…

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले..

vishwatmaklokswamivarta

राज्य सीईटी सेलच्या ‘सीईटी-अटल’ विशेष उपक्रमात 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी‘अटल’ ऑनलाइन नोंदणी प्रणालीमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे -उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta