vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

शिष्यवृत्ती लाभार्थी संख्येत वाढीसाठी प्रस्ताव सादर करावा- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

शिष्यवृत्ती लाभार्थी संख्येत वाढीसाठी प्रस्ताव सादर करावा- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, प्रतिनिधी : अनेक वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या संच संख्येत कोणतीही वाढ किंवा बदल करण्यात आलेला नाही. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ पोहचविण्यासाठी शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

मंत्रालयात विविध शिष्यवृत्तींबाबत व शिष्यवृत्ती योजनांच्या लाभार्थी संख्येत वाढ करण्याबाबत आढावा बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल, उपसचिव समीर सावंत, शिक्षण संचालनालयाचे (योजना) संचालक महेश पालकर व संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, सध्या इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४ थीमध्ये व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वीमध्ये घेण्यात याव्यात. या बदलामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकेल व त्यांचे पुढील शिक्षण सुलभ होईल. पुढील शिक्षण घेण्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. या कामाला गती देण्यात यावी. जेणेकरून येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल.

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन व विविध प्रकारची मदत दिली जाते. इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती-जमाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाही अशीच मदत करण्याबाबत प्रस्ताव संबंधित विभागाने सादर करावा, असेही शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासावर 130 मतदार नोंदणीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीविषयी जिल्हा प्रशासनाने केले वस्तुस्थितीदर्शक स्पष्टीकरण*

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय बाजार समित्यांचे सक्षमीकरण करताना शेतकरी हित व सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण गरजेचे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पानेवाडीत रंगला कुस्तीचा महासंग्राम! विजेत्यांना घाटगे पाटलांच्या मानाची बक्षिसे -पानेवाडीत कुस्तीचा महासंग्राम! विजेत्यांचा सत्कार!

तुप्पा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद ७४२ सातबारा व ५१२ आठ-अ उताऱ्यांचे वाटप; ४५ जणांना संजय गांधी योजनेचा लाभ

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समाज समिती चा महामोर्चा…

vishwatmaklokswamivarta

बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर , जळगांव तालुक्याला अवकाळी वादळी पावसाचा फटका…केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश..