
मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग यांच्या नियोजन विभाग आयोजित बचत गटामार्फत महिला मंडळाने तयार केलेल्या उत्पादित वस्तू चे भव्य प्रदर्शन आणि विक्री दोन दिवसीय प्रदर्शन विक्री कार्यक्रम संपन्न झाला
मुंबई प्रतिनिधी: मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये प्रत्येक वर्षाप्रमाणे याहीवर्षी महिला व बालकल्याण योजना व राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियाना अंतर्गत मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग यांच्या हद्दीत असलेल्या महिला मंडळे आणि बचत गटांचा दोन दिवसाचा प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बचत गटांच्या भव्य प्रदर्शन विक्रीला प्रत्येकाने भेटी दिल्या आणि विविध मंडळामार्फत व बचत गटामार्फत उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन मांडले होते त्यामध्ये कापडी पिशव्या, अभिवादन मेनबत्ती रांगोळी पंती मेणबत्ती स्टॅन्ड रांगोळी दिवाळी स्टिकर गारमेंट्स लेदर प्रॉडक्ट लेडीज ज्वेलरी दिवे अगरबत्ती कंदील मेकअप पाऊच, तोरण मोठे दिवे कापडी बॅग गारमेंट लेदर प्रॉडक्ट आधी खाद्यपदार्थ आणि प्रॉडक्ट प्रदर्शनस्थळी विक्री करण्यासाठी ठेवले होते तेल स्थानिकांनी मोठ्या संख्येने येथे येऊन भाग घेतला होता आणि प्रदर्शनाची पाहणी केली, या सर्वांसाठी मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग यांच्या नियोजन विभाग यांचे विशेष कार्य येथे दिसून आले पालिकेतील सर्वांचा सहभाग सदर प्रदर्शनस्थळी दिसून आला



