vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उत्कृष्ट गणेश मंडळाला पुरस्कारात सहभागी होण्याचे आवाहन

उत्कृष्ट गणेश मंडळाला पुरस्कारात सहभागी होण्याचे आवाहन

 

बुलडाणा, प्रतिनिधी

: पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उत्कृष्ट गणेश मंडळाला पुरस्कार देण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील गणेश मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी मंडळांचे गुणांकन करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

 

श्री गणेशोत्सव 2024 अंतर्गत उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचे व त्यासदंर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. यात उपजिल्हाधिकारी रोहयो हे अध्यक्ष असतील. तसेच पोलीस उपअधिक्षक, गृह, उप-प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अकोला, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्राचार्य, जिजामाता महाविद्यालय हे सदस्य असणार आहे. जिल्हा नियोजन अधिकारी हे सदस्य सचिव राहणार आहे.

 

जिल्हास्तरीय समिती गणेशोत्सव सुरू होण्याचा दि. 7 सप्टेंबर 2024 पासून अनंत चतुर्दशी दि. 17 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत प्रत्यक्ष भेट देणार आहे. व्हिडीयो व आवश्यक कागदपत्रे गणेशोत्सव मंडळाकडून प्राप्त करुन घेतील. समिती प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत शासन निर्णयामध्ये नमुद तक्त्यानुसार गुणांकन करुन त्यातील एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांच्या संबंधित कागदपत्रे, व्हिडीयो व गुणांकन संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई यांना सादर

संबंधित पोस्ट

ग्रामीण भागात ‘हर घर जल’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा आढावा,मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी केंद्र शासनाकडून विशेष निधीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

2027 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

जवखेडा येथील शेतकरी महिलेला तात्काळ नुकसान भरपाई द्या- शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन..

दीपोत्सव विशेष पर्व 🪔  🌻 *आनंदी पहाट* 🌻बहिणींच्या बंधुप्रेमाची*    *आज भाऊबीज.. यम द्वितीया*दिवाळी खऱ्या अर्थाने संपन्न होते ती भाऊबीजेला म्हणजे भावाची ओवाळणी झाल्यावरच,नात्यांची वीण आजन्म बळकट करणारी, मनोमनी चैतन्य निर्माण करणारी.. आनंदी दिवाळी.*

vishwatmaklokswamivarta

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा :वडीगोद्री येथे उपोषणकर्त्यांची राज्यशासनाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

गेल कंपनी उसर कंपनीकडून सेल (CARGO) ची वाहतूक करण्याकरीता वाहतूक बंदी अधिसूचना जारी