vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा :वडीगोद्री येथे उपोषणकर्त्यांची राज्यशासनाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा :वडीगोद्री येथे उपोषणकर्त्यांची राज्यशासनाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

 

 

राज्य प्रतिनिधी– ओबीसी आरक्षण बचाव मागणीसाठी वडीगोद्री (ता. अंबड) येथे उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची आज राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची चौकशी केली व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे यावेळी उपस्थित आहेत.

 

शिष्टमंडळाने श्री. हाके व श्री. वाघमारे यांच्यासमवेत त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. श्री. महाजन म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही, हे यापूर्वीच सरकारने स्पष्ट केले आहे. कुणावरही अन्याय होणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्यांबाबत सरकारशी अवश्य चर्चा करावी. जेणेकरुन त्यातून निश्चितपणे मार्ग निघेल. शासन आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे काळजी करु नये. उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती यावेळी उपोषणकर्त्यांना करण्यात आली.

संबंधित पोस्ट

दारूवरील उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात; नवे दर जाहीर…  

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची प्रभावी अंमलबजावणी

अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांची शोकसंवेदना

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर जयंती साजरी करण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूआज म्हणजेच 22 जुलै रोजी अतिवृष्टीबाबत ऑरेंज अलर्ट जारी…

पनवेल महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना 34 टन शाडू मातीचे मोफत वाटप!उप आयुक्त श्री. स्वरूप खारगे यांच्याकडून शाडू मातीचे वितरण व गणेशमूर्ती कारखान्याला भेट..