vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

        सांगली प्रतिनिधी) : महानगरपालिका, विभागीय शहरे, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी असणाऱ्या व योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावा, असे अवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालाच्या सहायक संचालक धनश्री भांबुरे यांनी केले आहे.

 

या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवासभत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करुन घेण्यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी 60 हजार रूपये, इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरीत क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 51 हजार रूपये, इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 43 हजार रूपये व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 38 हजार रूपये इतकी रक्कम लाभाच्या स्वरुपात वितरीत केली जाणार आहे.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी उच्च शिक्षणाचे व्दितीय, तृतीय व चतुर्थ वर्षासाठी अर्ज सादर करणे सुरू असून अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. तर उच्च शिक्षणाचे प्रथम वर्ष साठी अर्ज सादर करणे 5 ऑगस्ट पासून सुरू असून अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे. या योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे संपर्क करावा. या योजनेअंतर्गत अर्ज महाविद्यालयात देखील उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचे श्रीमती भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

महासंस्कृती, महानाट्य महोत्सव; दि.२२ ते २५ सांस्कृतिक कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

… ही तर शिंदे सेनेची सामाजिक दिवाळखोरी डॉ. संजय लाखे पाटील यांचा हल्लाबोल : आदित्य ठाकरेंच्या आपत्तीग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्याला संबोधले होते स्टंट..

vishwatmaklokswamivarta

उद्योजकांनी मिलाप प्रणालीचा लाभ घ्यावा – प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे

vishwatmaklokswamivarta

एकल प्‍लास्‍टीक यापुढे शहरात नियमितपणे कार्यवाही करण्‍यावर भर – अतिरिक्‍त आयुक्‍त श्री. अर्जुन गिराम.

vishwatmaklokswamivarta

जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरेल – मंत्री अतुल सावे

हिंदकेसरी पैलवान मारूती माने स्मारकातीलअपूर्ण कामे सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करावीत- पालकमंत्री – हिंदकेसरी पैलवान मारूती माने स्मारक समितीच्या बैठकीत दिल्या सूचना- स्मारक हस्तांतरणाची कार्यवाही महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta