vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

नेत्रदान पंधरवड्यानिमित्त अवयवदान जनजागृती

नेत्रदान पंधरवड्यानिमित्त अवयवदान जनजागृती

 

 

     सांगली, प्रतिनिधी) : नेत्रबुब्बुळाची मागणी व पुरवठा यातील तफावत भरून काढण्यासाठी नेत्रदान पंधरवडा दि. 25 ऑगस्टपासून साजरा करण्यात येत आहे. या निमित्त पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे अवयदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

या कार्यक्रम प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, नीता केळकर, डॉ. हेमा चौधरी, सुकुमार पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. गायत्री वडगावे आदि उपस्थित होते.

 

अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे अवयव संकलन केंद्राच्या माध्यमातून मेंदूमृत व्यक्तिच्या कुटुंबियांचे समुपदेशन करून त्यातून अवयव संकलन करण्याच्या प्रक्रियेस सुरूवात करण्यात येईल, असे मत अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी व्यक्त केले.

 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, मेंदू मृत अवस्थेत शोकाकुल परिस्थितीतील नातेवाईकांना समुपदेशन करणे व अवयवदानासाठी प्रोत्साहित करणे ही तारेवरची कसरत असून त्यातून घेतलेला धाडसी निर्णय लोकांचे प्राण वाचवू शकतो. अवयवदानाचा असा विचार समाजाकरिता प्रेरणादायी ठरू शकतो.

 

नेत्रदानाची चळवळ समाजामध्ये रूजलेली आहे. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे कार्यरत नेत्रपेढी व त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात कार्यरत 9 नेत्रपेढ्या यांच्या माध्यमातून 2024-25 मध्ये ऑगस्ट अखेर 52 नेत्रबुब्बुळे गोळा करण्यात आली. त्यापैकी 42 रूग्णांवर नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया करून दृष्टी प्रदान करण्यात आली. सन 2023-24 मध्ये एकूण 230 नेत्रबुब्बुळे गोळा करून त्यापैकी 134 रूग्णांवर नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. तर सन 2022-23 मध्ये एकूण 252 नेत्रबुब्बुळे गोळा करून 155 रूग्णांवर नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

 

यावेळी अवयवदान केलेल्या 3 कुटुंबांचे सत्कार करून अवयवदान केलेल्या नातेवाईकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जिल्ह्यातील अवयवदान मोहिमेच्या कामगिरीबद्दल नीता केळकर यांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले. प्रास्ताविक डॉ. हेमा चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार जिल्हा अवयवदान समन्वयक अविनाश शिंदे यांनी मानले.

 

00000

संबंधित पोस्ट

शिवद्रोही प्रशांत कोरटकरला अटक कराअन्यथा राज्याभरात तीव्र आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा, शिवप्रेमी संघटनांचे धरणे आंदोलन

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमुळे आर्थिक विकासाला गती- ⁠केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजर…

विशेष लेख :-   आशियाई विकास बॅंक (ADB) अर्थसहाय्यित

vishwatmaklokswamivarta

गोरगरीबांना स्वस्तात घरे मिळण्यासाठी प्रयत्न करू  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागातील कामवाटप झाले आता ऑनलाईन महाराष्ट्रात पहिल्यांदाच जिल्हा परिषद ठाणे मार्फत पेमेंट गेटवेचा वापर..

vishwatmaklokswamivarta