vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दांगट समितीचा अहवाल तत्वत: स्वीकारण्यात येणार- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

दांगट समितीचा अहवाल तत्वत: स्वीकारण्यात येणार- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

 

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात सुधारणा सुचविण्याबाबत नेमण्यात आलेल्या दांगट समितीचा अहवाल तत्वत: स्वीकारण्यात येणार असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

 

मंत्रालयात झालेल्या महसूल कायदा सुधारणा समितीच्या बैठकीवेळी महसूल मंत्री श्री.विखे पाटील बोलत होते.

 

बैठकीस समितीचे अध्यक्ष उमाकांत दांगट, सदस्य शेखर गायकवाड दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तसेच महसूल विभागाचे सहसचिव सुनील कोठेकर, अजित देशमुख, धनंजय निकम यासह विविध मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, जमीन महसुलाच्या अनुषंगाने राज्यातील कायदे जुने झाले आहेत. त्यामध्ये काल सुसंगत बदल व सुधारणा होण्याची गरज आहे. हे वेळोवेळी दिसून आले आहे. तसेच महसूल कायदा सुधारणा होण्याची आवश्यकता न्यायालयांनी देखील सुचविली होती. या अहवालाचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांमार्फत अवलोकन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

समितीच्या वतीने अध्यक्ष श्री दांगट, श्री.गायकवाड यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.समितीमध्ये अध्यक्ष निवृत्त सनदी अधिकारी श्री.दांगट, चंद्रकांत दळवी, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड आदींचा समावेश आहे. यावेळी बैठकीत विविध सुधारणा व तरतुदींच्या शिफारशींबाबत चर्चा करण्यात आली.

 

जमीन महसूल कायद्यात सुधारणा सुचविण्यासाठी राज्यातील भूधारक, शेतकरी, कायदा तज्ञ, नागरिक, सर्व संबंधित व्यक्ती आणि घटकांना वृत्तपत्रे, जाहिरातीच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले होते. जमीन महसूल सुधारणांबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. तसेच त्याची सुनावणी घेऊन या सुधारणांसाठी अहवालामध्ये राज्य शासनाला शिफारसी सादर करण्यात येत आहेत.

00000

संबंधित पोस्ट

वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या प्रयत्नांना यश**५० लाख युनिटची वीज चोरी उघडकीस*

vishwatmaklokswamivarta

राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकरिता नवी दिल्ली येथे परिषदेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै

विधानसभा निवडणूक २०२४-युवकांनो कर्तव्यबुद्धीने मतदान करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयात युवकांशी संवाद

vishwatmaklokswamivarta

नेहरू युवा केंद्र, जालना यांच्या वतीने जिल्हाभरात 12 ते 19 जानेवारी 2024 कालावधीत राष्ट्रीय युवा सप्ताह राबविला जात आहे,सरस्वती भुवन प्रशालेत दक्षता दिन साजरा

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी आनंदाची संधी!राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजना २०२५-२६-३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन