vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन द्वारे EVM/VVPAT विषयी जनजागृती

मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन द्वारे EVM/VVPAT विषयी जनजागृती

 

 राज्य प्रतिनिधी

रायगड (जिमाका)  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 7विधानसभा मतदार संघात EVM व VVPAT मशीनचे मतदारांना प्रशिक्षण, प्रसार, प्रसिध्दी व जनजागृती करण्याकरिता EVM प्रात्यक्षिक केंद्र आणि मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन तयार करण्यात आली आहे. या मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन 15 तालुक्यातील 7 विधानसभा क्षेत्रात फिरणार आहे. आज जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून या जनजागृती कार्यक्रमास प्रारंभ केला.

 

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने,उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे उपस्थित होते.

 

10 ऑक्टोबर पर्यंत ही मोबाईल व्हॅन 15 तालुक्यातील गावे, वाड्या, वस्ती येथे भेट देऊन ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट बाबत जनजागृती करणार आहे. या मोबाईल व्हॅनद्वारे प्रात्यक्षिक करता येणार आहे. तसेच EVM प्रात्यक्षिक केंद्र प्रत्येक विधानसभा मतदार संघस्तरावर मतदारांना प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

 

जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राच्या क्षेत्रात,गाव व शहरातील मुख्य चौक, बाजार, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींची कार्यालये, सभांच्या ठिकाणी इत्यादी मोक्याच्या ठिकाणी मोबाइल व्हॅनव्दारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. तसेच मतदारांना अभिरुप मतदान करण्यासाठी ईव्हीएम जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. याचा लाभ जिल्हयातील जास्तीत जास्त मतदारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

राज्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठामधील आजच्या परीक्षा देखील रद्द; नव्या तारखा लवकरच होणार जाहीर

विधानसभा इतर कामकाज :मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारसीचा ठराव संमत

प्रशासकीय कामकाजातून मराठी भाषा-संवर्धनाचे काम करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

विजयादशमी आज:शुभ योगात दसरा; आज दिवसभर खरेदीसाठी शुभ मुहूर्त, श्रीराम आणि शस्त्र पूजेसाठी दुपारी 2 नंतर विजय मुहूर्त

vishwatmaklokswamivarta

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस आघाडीवर, कसबा मतदारसंघात हेमंत रासने पिछाडीवर, चिंचवड येथे काय होणार आहे

संत बाळूमामा देवस्थानचे संभाव्य सरकारीकरण रहित करून गैरव्यवहारांच्या प्रकरणांची तात्काळ ‘सी.आय.डी.’ चौकशी करा ! – कोल्हापूर येथे ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ मोर्चाद्वारे भक्तांची एकमुखी मागणी

vishwatmaklokswamivarta