vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बोईसर येथे कलाकारांची कार्यशाळा संपन्न

बोईसर येथे कलाकारांची कार्यशाळा संपन्न

 

सुरेश गायकवाड पालघर येथून

मुंबई- पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील सरावली साईधाम द्वारकेश नगरच्या रोहाऊस क्रमांक ७ येथे कलाकारांची कार्यशाळा आर.जे. सिने वर्ल्डचे निर्माता, दिग्दर्शक, लेखक रुपेश जाधव आणि सहकाऱ्यांनी आयोजित केली होती. ती कार्यशाळा संपन्न झाल्याने स्नेहसंमेलनासह पत्रकार परिषद ही घेण्यात आली. त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून विरार पो. ठाणेचे बीट इन्चार्ज रमेश शिंदे, डॉ .तायडे ॲङ प्रविण असर्गेकर, आवाज इंडियाचे पत्रकार विनोद कांबळे, छायाचित्रकार उबाळे, पोलीस टाइम्सचे पत्रकार सुरेश गायकवाड, तुफान एक्सप्रेसचे संपादक ज्ञानेंद्र पांडे, त्यांचे सहकारी जेपी जैस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळेस आर .जे . सिने वर्ल्डचे निर्माता, दिग्दर्शक, लेखक रुपेश जाधव म्हणाले की, या कार्यशाळेत जवळजवळ ३ महिने कलाकारांची कार्यशाळा घेण्यात आली त्यात जवळपास ८० कलाकारांनी सहभाग घेतला होता. त्या सहभाग घेतलेल्या कलाकारांचा अभिनय पाहून त्यांना येणाऱ्या आगामी चित्रपटात भूमिका सादर करावयास मिळणार आहे. आणि जवळपास १०० हून अधिक कलाकार असणार आहे.

याशिवाय ज्या कलाकारांनी यापूर्वी चित्रपटात, टिव्ही मालिकांमध्ये छोटे मोठे कामे केली आहेत. असे अनुभवी कलाकार सोबत असणार आहेत. त्यात विद्या सूर्यवंशी, वरुण राठोड, विनोद सिंग, जयनिशा, टारझन कुमार, लक्ष्मी राठोड, असे मुरब्बी कलाकार एकत्र येऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांवर लहानपणापासून ते वयोवृद्धापर्यंत बलात्कार, खून, मारझोड आदी अन्याय अत्याचार होत आहेत हे अन्याय अत्याचार होऊच नये याविषयासंबंधी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ह्या वेळेस अनेक अनुभवी कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त करून पाहुण्यासह मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करूनआर . जे .वर्ल्डचे निर्माता, दिग्दर्शक, लेखक रुपेश जाधव आणि त्यांच्या सर्व टिमचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

संबंधित पोस्ट

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त संसदेच्या केंद्रीय सभागृहात त्यांच्या प्रतिमेस सदस्यांनी पुष्पांजली अर्पण केली.

पोलिसांच्या अनुकंपा नियुक्त्यांचा निर्णय मिशन मोडवर राबविला जाणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन व ‘सीईजीआयएस’ यांच्यात सामंजस्य करार

डी.एल.एड्. प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज भरण्यास 10 जून मुदत…

ब्रॉडगेज प्रकल्पासाठी खाजगी जमीन खरेदी प्रक्रियेला वेग जिल्हाधिका-यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वाटप…

पदवीधर मतदारांच्या संख्येत वाढ होणार – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी नागपूर पदवीधर मतदार संघासाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; एका महिन्यात १ लाख ७ हजार मतदारांची नोंद

vishwatmaklokswamivarta