vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत मुंबई विभागातील 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येला जाणार

  मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत मुंबई विभागातील 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येला जाणार

 

 

नवीमुंबई, प्रतिनिधी– सामाजिक न्याय विभागाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्हयातील 800 ज्येष्ठ नागरिक 04 ऑक्टोबर 2024 रोजी अयोध्येसाठी विशेष ट्रेन ने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) सीएसटी येथून रवाना होणार आहेत.

 

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरीक जे 60 वर्ष किवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना तिर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये भारतातील एकूण 73 व महाराष्ट्रातील 66 तीर्थस्थळांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत मुंबई विभागातील मुंबई शहर या जिल्हयातून 150, मुंबई उपनगर या जिल्हयातून 306 व ठाणे जिल्हयातून 471 इतके अर्ज अयोध्येला जाण्यासाठी प्राप्त झाले आहेत. यापैकी पहिल्या टप्यातील मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्हयातून 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येसाठी जाणार आहेत.

 

यासाठी सदर विशेष ट्रेन 04 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 01:30 वाजता मुंबई येथून रवाना होईल व 08 ऑक्टोबर 2024 रोजी अयोध्येतून मुंबईला परत येईल. सदर योजनेसाठी उत्पनाची अट 2.5 लाख आहे. वैद्यकीय दाखला, वयाचे 60 वर्ष पूर्ण इ. अटी आहेत. या योजनेअंतर्गत मुंबई विभागातून ज्येष्ठ नागरिकांचे दिक्षाभूमी नागपूर, अजमेर, महाबोधी मंदीर गया, शेगाव, पंढरपूर इ. साठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हयातून एकूण 2505 अर्ज प्राप्त झाले आहेत. यासंबंधी नियोजन सुरू आहे. तरी, ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण या कार्यालयांशी संपर्क साधावा. असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे

संबंधित पोस्ट

बारावीचा आणखी एक पेपर फुटला; शिक्षणाधिकाऱ्यांकडून तपास सुरू..

vishwatmaklokswamivarta

स्वामी समर्थ महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल व्यवस्थापन संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू*

सेवा पंधरवडा लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून साजरा करा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

महाज्योती’च्या संशोधकाचा‘कॅडमियम टेलुराईड सोलर सेल’वर अनोखा अभ्यास,स्वच्छ सौर ऊर्जा स्त्रोतावर डॉ.दीपमाला साळी यांचे उपयुक्त संशोधन माफक दरात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेची निर्मितीवर शोध प्रबंध

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे,  भाजपा मुंबई अध्यक्षआशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे डॉ. धिरज छाबडा यांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta