vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

समाजकल्याण विभागाकडून लाभार्थ्यांना निधीचे वितरण..

समाजकल्याण विभागाकडून लाभार्थ्यांना निधीचे वितरण..

 

 

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणालीद्वारे पिडीत व्यक्तींना त्यांच्या बँक खात्यावर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व परभणी यांच्या स्तरावरुन रक्कम वर्ग करुन लाभ दिला असल्याची माहिती प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी दिली.

प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर या कार्यालयातर्फे 2022-23 ते 2024-25 या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत निधी खर्च करण्यात आला असल्याचे प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी कळविले आहे.

समाज कल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर मार्फत सन 2022-23 या वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 6 कोटी 57 लाख 70 हजार निधी प्राप्त झाला होता. निधी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण वितरीत करण्यात आला होता. सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण यांच्या स्तरावरुन खर्च करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर -1 कोटी 80 लाख यामध्ये पिडीत लाभार्थी यांना लाभ दिल्याची संख्या -240, जालना -1 कोटी 03 लाख 70 हजार यामध्ये पिडीत लाभार्थी यांना लाभ दिल्याची संख्या -114, बीड-1 कोटी 82 लाख यामध्ये पिडीत लाभार्थी यांना लाभ दिल्याची संख्या -167, परभणी – 1 कोटी 92 लाख यामध्ये पिडीत लाभार्थी यांना लाभ दिल्याची संख्या – 220

2023-2 4 या वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 6 कोटी 96 लाख निधी प्राप्त झाला होता. छत्रपती संभाजीनगर -2 कोटी 51 लाख यामध्ये पिडीत लाभार्थी यांना लाभ दिल्याची संख्या – 302, जालना -1 कोटी 30 लाख यामध्ये पिडीत लाभार्थी यांना लाभ दिल्याची संख्या -156 , बीड-1 कोटी 31 लाख यामध्ये पिडीत लाभार्थी यांना लाभ दिल्याची संख्या -126 परभणी -1 कोटी 84 लाख यामध्ये पिडीत लाभार्थी यांना लाभ दिल्याची संख्या -168

2024-25 या वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 2 कोटी 70 लाख निधी प्राप्त झाला होता. छत्रपती संभाजीनगर – 77 लाख निधी प्राप्त असून यामध्ये पिडीत लाभार्थी यांना लाभ दिल्याची संख्या – 70, जालना -58 लाख यामध्ये पिडीत लाभार्थी यांना लाभ दिल्याची संख्या – 56, बीड-45 लाख यामध्ये पिडीत लाभार्थी यांना लाभ दिल्याची संख्या- 35 परभणी -90 लाख यामध्ये पिडीत लाभार्थी यांना लाभ दिल्याची संख्या – 97

पिडीत व्यक्तींना त्यांच्या बँक खात्यावर रक्कम पी. एफ. एम. एस. प्रणालीव्दारे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण छत्रपती संभाजीनगर,जालना,बीड,परभणी यांच्या स्तरावरुन सदर रक्कम वर्ग करुन लाभ दिला असल्याची माहिती प्रादेशिक उपायुक्त श्रीमती सोनकवडे यांनी दिली आहे

संबंधित पोस्ट

अयोध्येत राम लल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडताच कलाकारांनी साजरा केला आनंदोत्सव; राजपाल यादवने केला डान्स, तर कंगनाने दिल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा..

vishwatmaklokswamivarta

१०९ औरंगाबाद (पूर्व)च्या महिला मतदारांचा निर्धार, ‘मतदान करणारच’**ब्रॅण्ड ॲम्बेसेडर आदिती निलंगेकरच्या उपस्थितीने महिलांमध्ये संचारला उत्साह*

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेला उत्तम प्रतिसादकोकण विभागात 5 हजार 384 उमेदवारांची निवड    – उपायुक्त दिलीप पवार

vishwatmaklokswamivarta

व्हॉइस ऑफ मीडियाच्या अंदाज स्पर्धेचे निकाल जाहीर!पत्रकार भवनात बुधवारी बक्षीस वितरण…

vishwatmaklokswamivarta

रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती करा!इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाची मागणी

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहीण योजना’तीन हजारांपेक्षा जादा लोकसंख्येच्या गावांतआजपासून (दि.२५) तीन दिवस नोंदणी शिबिरांचे आयोजन५ लाख १३ हजार १३० बहिणींची नोंदणी पूर्ण