vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती करा!इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाची मागणी

रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती करा!इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाची मागणी

जालना/प्रतिनिधी-जालना शहरातील रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अंत्यत दुरावस्था झाली आहे. सदरील रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी परशुराम जन्म उत्सव समिती जालनाचे माजी अध्यक्ष श्रीपाद त्रिंबकराव रत्नपारखी व ॲड. विनोद कुलकर्णी यांनी केली आहे.

याबाबत जालना शहर महापालिकेचे अति. आयुक्त गिराम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, शहरातील रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत भयावह अवस्था आहे. पुलाखालील रस्त्याने अंत्ययात्रा घेवून जातांना दुःखात असलेल्या बांधवांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एखादवेळेस अंत्ययात्रेत स्वर्गरथाचा अपघात होवून दुर्घटना घडू शकते. त्यामुळे शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी व स्मशानभुमीसमोर वाहनाचा वेग नियंत्रीत रहावा यासाठी येथे वेग मर्यादा व दिशाफलक लावण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर इंजि. श्रीपाद रत्नपारखीख ॲड. विनोद कुलकर्णी, सिध्देश्‍वर पिंपरकर, मयुर लोखंडे यांनी केली आहे.

—-

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अभिनव संकल्पनेतून राज्यात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शंभर टक्के पारदर्शक बदल्या

माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्यास मुदतवाढ

शिवजयंतीचे औचित्य साधून कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये बंधारे, गाव तलाव व लघु पाटबंधारे तलावातून गाळ काढण्याचा कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

भगूर शहराच्या विकासाला नवी चालना मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  बालभवनच्या नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी केली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचे आश्वासन पूर्ण न झाल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा हक्कभंगाचा प्रस्ताव