vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची-त्रैमासिक सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी…

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची-त्रैमासिक सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी…

 

रायगड( प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवा योजन कार्यालये‍ (रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे) कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सार्वजनिक क्षेत्रातील सर्वशासकीय, निमशासकीय आस्थापना तसेच कलम 4 (2) अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणाऱ्या सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या मनुष्यबळाची (पुरुष-स्त्री) दरतिमाही (मार्च/जून/सप्टेंबर/डिसेंबर) अखेरची माहिती महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.

त्यानुषंगाने आपल्या आस्थापनेची माहे डिसेंबर, 2024 अखेर संपणाऱ्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीची नमुना ई आर-1 मधील त्रैमासिक विवरणपत्र आस्थापनांनी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Employment या टॅबवरील Employer (List a Job) याला क्लीक करुन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरुन लॉगिन करावे लॉगिन झाल्यावर आपल्या आस्थापनेची माहिती अद्ययावत करुन ER-1 वर क्लिक करावे Enter ER-1 याद्वारे úआपल्याकडील अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी. हे त्रैमासिक विवरणपत्र सादर करण्याचा कालावधी दि.01 जानेवारी ते दि.31 जानेवारी 2025 आहे याची सर्वशासकीय व खाजगी आस्थापनांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे प्रत्येक आस्थापनेने आपल्या आस्थापनेचा नोंदणी तपशील (Employer Profile) देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्यावत करावी, या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा युजर आयडी/पासवर्ड याबाबत माहिती आवश्यक असल्यास या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर-02141-222029 अथवा कार्यालयाचे लिपिक-टंकलेखक श्री. म.भा.वखरे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9421613757 वर संपर्क साधल्यास आपणास या कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या, सहायकआयुक्त श्रीम. अ.मु.पवार, यांनी केले आहे.००००००

संबंधित पोस्ट

मराठी ही केवळ संवादाची नव्हे, तर रोजगाराची भाषा व्हावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा येथे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

vishwatmaklokswamivarta

डिजिटल पत्रकारिता : वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित,जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये पॅनेल चर्चेत डिजिटल माध्यमातील पत्रकारिता आणि आव्हानांवर चर्चा..

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन• *नागरिकांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधीत पोस्ट करण्याचे आवाहन*• *शालेय विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

रेरा’ कायद्यामुळे महाराष्ट्रातील रियल ईस्टेट क्षेत्राला विश्वासार्हता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकास प्रक्रियेत रियल ईस्टेट क्षेत्राचा सहभाग महत्वाचा

4 सप्टेंबरला पोलिस पाटील भरतीसाठी आरक्षण सोडत

vishwatmaklokswamivarta

मोफत कोचिंग योजनेच्या लाभासाठी 3 ऑगस्टपर्यंत नोंदणीचे आवाहन