vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे डॉ. धिरज छाबडा यांचा सन्मान

रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे डॉ. धिरज छाबडा यांचा सन्मान

जालना/प्रतिनिधी-मानवतावादी आरोग्य सेवेत 24 वर्षापासून कार्यरत रेड स्वस्तिक सोसायटीच्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त व सोसायटीच्या वतीने राबविण्यात आलेल्या आरोग्य सेवेत गरजवंतांना आरोग्य सेवा दिल्याबद्दल जालना येथील मधुमेह तज्ञ डॉ. धिरज शांतीलाल छाबडा यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

12 जानेवारी रोजी नागपुरातील अर्जुना सेलेब्रीशन सभागृह व्यंकटेशनगर खमला नागपुर येथे राष्ट्रीय स्तरावर वर्धापनदिनाचा शानदार कार्यक्रम पार पडला.

डॉ. छाबडा यांना आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय अग्रवाल, बँक ऑफ इंडीयाचे झोनल मॅनेजर जय नारायण, रेड स्वस्तिक सोसायटीचे संस्थापक टी.एस. भाल, राष्ट्र अध्यक्ष सुरेश कोते, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद चौगुले, विपीन भाईै पटेल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला

 यावेळी जालना येथील डॉ. आरती मंत्री, जितेंद्र यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यकारी अध्यक्ष भगवान राऊत, महाराष्ट्र अध्यक्ष हेमंत गोरे, सचिव अशोक शिंदे यांच्यासह सचिव डॉ. मोहन शिंदे, डॉ. दिपक मंत्री, जालना येथील रेड स्वस्तिक सोसायटीचे पदाधिकारी शकील खान, रितेश अग्रवाल यांची उपस्थिती होती. रेड स्वस्तिक सोसायटीने गेल्या 24 वर्षापासून 95 लक्ष गरजवंतांना आरोग्य सेवा मिळवून दिली आहे. डॉ. धिरज छाबडा यांचा सन्मान झाल्याबद्दल त्यांचे डॉ. रेखा छाबडा, डॉ. सौ. तरूणा छाबडा, रजत चौविश्या, रूपेश चौविश्या व मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.

संबंधित पोस्ट

दापोली, खेड, मंडणगडमधील प्रलंबित ऊर्जा कामांना गती द्या – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुक्त व डीजेमुक्त समाजनिर्मिती हीच महापुरुषांना खरी आदरांजली-अनंत कुलकर्णी-हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव समिति चे सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी

पनीरच्या नावाखाली ॲनालॉगचा वापर- आढळल्यास आता थेट कारवाई

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नगरपरिषद व नगरपचांयत क्षेत्रात2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्तेखरपुडी येथे नीट, जेईई परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार संपन्न