vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

राज्यातील खेळाडुंसाठी पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ…

राज्यातील खेळाडुंसाठी पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ…

 

राज्य प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

ऑलिंम्पिंक, पॅराआलिंम्पिंक सूवर्ण पदक विजेत्यांना पाच कोटी रुपये, रौप्य पदकासाठी तीन कोटी, कांस्य पदकासाठी दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे पन्नास लाख, तीस लाख व वीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

 

वरिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी सूवर्ण पदक विजेत्यांना तीन कोटी रुपये, रौप्य पदकासाठी दोन कोटी, कांस्य पदकासाठी एक कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे तीस लाख, वीस लाख व दहा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

 

एशियन गेमसाठी सूवर्ण पदक विजेत्यांना एक कोटी रुपये, रौप्य पदकासाठी पंच्याहत्तर लाख, कांस्य पदकासाठी पन्नास लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे दहा लाख, सात लाख पन्नास हजार व पाच लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

 

वरिष्ठ कॉमनवेल्थसाठी सूवर्ण पदक विजेत्यांना सत्तर लाख रुपये, रौप्य पदकासाठी पन्नास लाख, कांस्य पदकासाठी तीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे सात लाख, पाच लाख व तीन लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

 

युथ ऑलिंम्पिंकमधील सूवर्ण पदक विजेत्यांना तीस लाख रुपये, रौप्य पदकासाठी वीस लाख, कांस्य पदकासाठी दहा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे तीन लाख, दोन लाख व एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

 

तसेच सांघिक खेळात ऑलिंम्पिंक, पॅराआलिंम्पिंकमध्ये सूवर्ण पदक विजेत्यांना तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये, रौप्य पदकासाठी दोन कोटी पंचवीस लाख तर कांस्य पदकासाठी एक कोटी पन्नास लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे सदतीस लाख पन्नास हजार, बावीस लाख पन्नास हजार व पंधरा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

 

सांघिक खेळात वरिष्ठ चॅम्पियनशीपमधील सूवर्ण पदक विजेत्यांना दोन कोटी पंचवीस लाख लाख रुपये, रौप्य पदकासाठी एक कोटी पन्नास लाख लाख तर कांस्य पदकासाठी पंच्याहत्तर लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे बावीस लाख पन्नास हजार, पंधरा लाख आणि सात लाख पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

 

सांघिक खेळात एशियन गेममध्ये सूवर्ण पदक विजेत्यांना पंच्याहत्तर लाख रुपये, रौप्य पदकासाठी ५६ लाख पंचवीस हजार तर कांस्य पदकासाठी सदतीस लाख पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे सात लाख पन्नास हजार, पाच लाख बासष्ठ हजार पाचशे रुपये व तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

 

सांघिक खेळात वरिष्ठ कॉमनवेल्थ स्पर्धेतील सूवर्ण पदक विजेत्यांना बावन्न लाख पन्नास हजार रुपये, रौप्य पदकासाठी सदतीस लाख पन्नास हजार, तर कांस्य पदकासाठी बावीस लाख पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे पाच लाख पंचवीस हजार, तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये व दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

: सांघिक खेळात वरिष्ठ कॉमनवेल्थ स्पर्धेतील सूवर्ण पदक विजेत्यांना बावन्न लाख पन्नास हजार रुपये, रौप्य पदकासाठी सदतीस लाख पन्नास हजार, तर कांस्य पदकासाठी बावीस लाख पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे पाच लाख पंचवीस हजार, तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये व दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

 

सांघिक खेळात युथ ऑलिंम्पिंकमधील सूवर्ण पदक विजेत्यांना बावीस लाख पन्नास हजार रुपये, रौप्य पदकासाठी पंधरा लाख, तर कांस्य पदकासाठी सात लाख पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे दोन लाख पंचवीस हजार, एक लाख पन्नास हजार रुपये व पंच्याहत्तर हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

संबंधित पोस्ट

भारतीय महिला क्रिकेटपटू तानिया भाटिया हिच्या सामानाची लंडनमध्ये चोरी; सोशल मीडियावर दावा

vishwatmaklokswamivarta

मोहालीच्या मैदानात फिरली रवींद्र जडेजाची तलवार, दुसऱ्या कसोटी शतकानंतर केले धमाकेदार सेलिब्रेशन; 

राज्याला तिरंदाजीची भूमी बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे,असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस…

vishwatmaklokswamivarta

रोमहर्षक सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा विजय, मुंबईचा तीन धावांनी पराभव, प्लेऑफची लढत झाली रंजक

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन…

कोरिया इथं झालेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ८ सुवर्णासह एकूण २४ पदकांची कमाई.