vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन…

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे  अध्यक्ष अमोल काळे यांचं ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते न्यूयॉर्कमध्ये होते. अमोल काळे यांच्या निधनाने क्रिकेट वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रविवारी झालेला भारत – पाकिस्तान सामना पाहण्यासाठी ते न्यूयॉर्कला गेले होते. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंट इंटरनॅशनल स्टेडिअमवर त्यांनी काही फोटोही काढले. त्यांच्याबरोबर एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक आणि अपेक्स काउन्सीलचे सदस्य सूरज सामंतही होते. पण सामना संपल्यानंतर अमोल काळे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे.

 

कोण होते अमोल काळे?

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अमोल काळे यांनी पवार-शेलार पॅनलकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. या निवडणुकीत अमोल काळे यांनी संदीप पाटील यांचा पराभव केला. एमसीएच्या अध्यक्षपदाबरोबरच अमोल काळे आंध्र प्रदेशमधल्या तिरुमला देवस्थानमचे विश्वस्तही होते.

 

अमोल काळे हे मुळचे नागपूरचे होते, नागपूरमझल्या अभ्यंकर नगर इथे ते आपल्या कुटुंबासोबत राहात होते. अमोल यांचे आई आणि वडिल दोघंही पेशाने शिक्षक होते. अमोल यांचा मुख्य व्यवसाय हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचा होता. याशिवाय रिअल इस्टेट, वैद्यकीय, लॉजिस्टिक्स, मीडिया व्यवस्थापन, संरक्षण, ऊर्जा क्षेत्रातही कार्यरत होते. जे.के. सोल्युशन्स बरोबरच ते अर्पित एन्टरप्रायझेस या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील मुख्याध्यापकाचे आझाद मैदानात आमरण उपोषण…

vishwatmaklokswamivarta

८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !**‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या समारोपातून शौर्याची प्रेरणा !*

vishwatmaklokswamivarta

मोदी सरकार पुढील दीड वर्षात 10 लाख नोकर्‍या देण्याच्या तयारीत; PM Narendra Modi यांचे मंत्रालयांना निर्देश

मोरगावच्या मयुरेश्‍वराप्रमाणे साजरा होणारा.गणेशोत्सवाआधी दोन दिवस सुरू…

vishwatmaklokswamivarta

मुंबई-पुणे दरम्यान धावणारी प्रगती एक्सप्रेस 25 जुलैपासून विस्टाडोम कोच सह; आजपासून बुकिंग सुरू

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला प्रत्युत्तर देणार?…

vishwatmaklokswamivarta